उल्हासनगर कचरा मुक्तीसाठी महापालिका आयुक्त ऑन फिल्ड; ठेकेदाराचे दणाणले धाबे

By सदानंद नाईक | Updated: January 31, 2025 21:13 IST2025-01-31T21:12:52+5:302025-01-31T21:13:33+5:30

१०० दिवसाचा स्वच्छता आराखडा, स्वच्छता मार्शलची नियुक्ती 

municipal commissioner on field for ulhasnagar garbage clearance | उल्हासनगर कचरा मुक्तीसाठी महापालिका आयुक्त ऑन फिल्ड; ठेकेदाराचे दणाणले धाबे

उल्हासनगर कचरा मुक्तीसाठी महापालिका आयुक्त ऑन फिल्ड; ठेकेदाराचे दणाणले धाबे

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहर कचरा मुक्तीसाठी महापालिका विविध उपक्रम राबवूनही शहरांत कचाऱ्यांचे ढीग साचल्याचे चित्र आहे. दरम्यान आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी ऑन फिल्ड उतरत साफसफाईची पाहणी करून आरोग्य विभागाकडून १०० दिवसाचा स्वच्छता आराखडा तयार केला. तसेच स्वच्छता मार्शलची नियुक्ती केली.

 उल्हासनगर महापालिकेच्या मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन १०० दिवसाचा स्वच्छता आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार सखोल स्वच्छता मोहीम शहरात राबविण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते, चौक, सार्वजनिक शोचालय, कार्यालय, उद्याने, तसेच रस्त्यावरील खडी-रेती, धूळ याना टार्गेट करून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त आयुक्त किशोर गवस याच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसाचा आराखडा तयार करून २७ जानेवारी पासून त्याची सुरुवात प्रभाग समिति निहाय करण्यात आली आहे. 

महापालिका आरोग्य विभागाच्या स्वच्छता आराखदडाची पडताळणी आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी ऑन फिल्ड उतरत कॅम्प नं-४ येथील २९ ओटी सेक्शन ते विनस चौक या रस्त्याची पाहणी केली. दरम्यान काही दुकानदार रस्त्याची स्वच्छता केल्यानंतर दुकानासमोर झाडलोट करून केरकचरा, चहाचे कप दुकाना समोर टाकल्याचे पाहणीत आयुक्ताना आढळून आले. शहर स्वच्छतेत बाधा आणणाऱ्या व्यवसाहिक दुकानदाराना स्वच्छतेचे महत्व यावेळी पट्यून दिले. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अहवान आयुक्तानी केले. 

महापालिका प्रभाग समिती क्रं-३ कार्यालय अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण  महापालिकेने प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसपाइचे खाजगीकरण केले असून महापालिका वर्षाला त्यावर १० कोटीचा खर्च करीत आहे. १० कोटींचा खर्च करूनही प्रभाग समिती क्रं-३ कचरा मुक्त झाला नाही. 

स्वच्छता मार्शलची नियुक्ती

शहर कचरा मुक्त होण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने ३२ स्वच्छता मार्शलची नियुक्ती केली. रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कार्यवाही हे मार्शल करणार आहेत. तसे निर्देश स्वच्छता निरीक्षकाना आयुक्तानी दिले.

Web Title: municipal commissioner on field for ulhasnagar garbage clearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.