घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST2021-07-14T04:44:31+5:302021-07-14T04:44:31+5:30

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क येथे उभारलेल्या ...

Municipal Commissioner inspects solid waste processing projects | घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता हिरानंदानी इस्टेट आणि ऋतू पार्क येथे उभारलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळांना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी भेट देऊन तेथील कार्यप्रणालीची पाहणी केली.

शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता मौजे डायघर येथे प्रकल्प उभारणीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून विकेंद्रित पद्धतीने ५-५ मेट्रिक टन क्षमतेचे प्रकल्प उभारून पहिल्या टप्प्यात १०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हिरानंदानी इस्टेट येथे बायोकम्पोस्टिंग २० मेट्रिक टन, मेकॅनिकल कम्पोस्टिंग १० मेट्रिक टन व बायोमिथेल गॅस ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. ऋतू पार्क येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा मेकॅनिकल कम्पोस्टिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे.

शहरातील विविध ठिकाणांहून दररोज ओला व सुका कचरा ठाणे महापालिकेच्या हिरानंदानी इस्टेट व ऋतू पार्क या दोन प्रकल्पस्थळी आणला जात असून, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून या प्रकल्पांची आयुक्तांनी पाहणी केली. या वेळी उपआयुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर आदी उपस्थित होते. भविष्यातील प्रकल्पस्थळाच्या नियोजनाविषयी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन कचऱ्याचे संकलन, वाहतूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट प्रणाली व्यवस्थित राबविली जात असली तरी त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Web Title: Municipal Commissioner inspects solid waste processing projects