विकासकावर पालिकेची मेहरनजर
By Admin | Updated: May 9, 2017 01:00 IST2017-05-09T01:00:23+5:302017-05-09T01:00:23+5:30
श्रीरंग सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्याच्या सफाईची जबाबदारी रूस्तमजी या विकासकाकडे असतानाही मागील चार वर्षे पालिकेने

विकासकावर पालिकेची मेहरनजर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : श्रीरंग सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्याच्या सफाईची जबाबदारी रूस्तमजी या विकासकाकडे असतानाही मागील चार वर्षे पालिकेने या कामावर २७ लाखांचा खर्च करूनही त्याची सफाई योग्य झालेलीच नाही. याबाबत, तक्र ार केल्यानंतर बिल्डरला सफाईची सक्ती केली, तरी त्याच्याकडून अत्यंत बेजबाबदार पद्धतीने सफाई होत असून याकडे पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी केला आहे. त्यामुळे श्रीरंग, वृंदावन, राबोडी, आनंदपार्क, आझादनगर या सुमारे ७० हजारांच्या वस्तीत पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
राबोडी, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी हा परिसर सखल आहे. त्याशिवाय खाडी जवळच असल्याने पावसाळ्यात या भागात नेहमीच पाणी साचते. या भागातील पाण्याचा निचरा करणारा मोठा नाला असून त्याची सफाई दरपावसाळ्यात वादग्रस्त ठरत आहे. या भागात रूस्तमजी बिल्डर्सच्या टाऊनशिपला मंजुरी देताना नियमानुसार नाल्याच्या सफाईचे काम विकासकाकडे सोपवले होते. मात्र, त्यानंतरही २०१२ ते १५ ही चार वर्षे पालिकाच हे काम करत होती. त्याबाबत मिलिंद पाटणकर यांनी विचारणा केली असता चार वर्षांत पालिकेने या कामावर २७ लाख रु पये खर्च केल्याचे लेखी उत्तर देण्यात आले आहे. हे पैसे विकासकाकडून वसूल करणे अपेक्षित असताना त्यातही हलगर्जी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पालिकेचा हा बेजबाबदार कारभार आता चव्हाट्यावर आल्यानंतर गेल्या वर्षीपासून विकासकाकडून नालेसफाई करून घेतली जात आहे. मात्र, ती अत्यंत बेजबाबदार पद्धतीने होत असून अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही बिल्डरशी असलेल्या सलगीमुळे त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाटणकर यांचे म्हणणे आहे. नाल्याभोवती विकासकाने भिंतीची बेकायदा बांधकामे केली आहे.