मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 09:52 PM2019-09-03T21:52:30+5:302019-09-03T21:56:37+5:30

मुंब्रामध्ये नांदते अनोखी राष्ट्रीय एकात्मता    

In Mumbra in five pandals celebrating ganesh utsav and moharam together | मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

मुंब्रा येथे पाच ठिकाणी एकाच मंडपात गणेश उत्सव आणि मोहरम

googlenewsNext

कुमार बडदे
मुंब्रा - "मजहब नही सिखाता आपसमे बैर रखना" या काव्यपंक्ती नुसार वेळोवेळी वागून राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणाऱ्या मुंब्र्यातील रहिवाशांनी पुन्हा एकदा एकाच मंडपात तसेच जवळजवळ गणेशोत्सव आणि मोहरमचे कार्यक्रम सादर केले. त्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अनोखी राष्ट्रीय एकात्मता दाखविली. ते दाखवत असलेल्या या अनोख्या राष्ट्रीय एकात्मतेमुळे एका ठिकाणी तर एकाच स्पिकर मधून आरती आणि मजलिसचे (मोहरनिमित्त साजरा होणारा धार्मिक कार्यक्रम) सूर बाहेर निघत असल्याचे विरळ दृश्य दिसत आहे.

नेहमीच एक दुसऱ्याच्या धर्माचा, भावनांचा आदर करुन सण, उत्सव साजरे करणारे येथील  हिंदू-मुस्लिम सध्या पाच  ठिकाणी  गणपती आणि मोहरमचे कार्यक्रम साजरे करत आहेत. नेहमीच संयमाने वागून येथील नागरिकांनी वेळोवेळी एकोपा जपला आहे. दोन्ही धर्मातील रुढी, परंपरा यांचा आदर  करण्याची यापूर्वीची परंपरा कायम ठेवण्याच्या हेतूने येथील काही गणेश मंडळांनी आणि मोहरम कमेटीने गणेश  उत्सव आणि मोहरमचे कार्यक्रम एकाच मंडपात साजरे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आनंद कोळीवाडा येथील गणेश मित्र मंडळ तसेच विश्व मित्र मंडळ आणि चर्णीपाडा येथील एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि मोहरम कमेटीचे पदाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर बैठक घेतली. त्यात झालेल्या चर्चेअंती वरील ठिकाणच्या दोन्हीं कडच्या पदाधिका-यांनी एकाच मंडपात गणपती उत्सव तसेच मोहरमचे कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका पोलिस अधिका-याने दिली.

गतवर्षीही त्यांनी राबवलेल्या या अनोख्या कल्पनेबद्दल काही मंडळाचा आणि मोहरम कमेटी मधील पदाधिका-यांचा पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते नुकताच ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या समारंभात सन्मानचिन्ह तसेच प्रशस्ती पत्रक देऊन  संत्कार करण्यात आला. दोन्ही  समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी दाखवलेल्या या सामजस्यां बद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. गणेश मित्र मंडळाच्या मंडपात तर आरती तसेच मोहरमनिमित्त होणारी मजलिस आणि थेट प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज एकाच माईकचा आणि स्पिकरचा वापर करण्यात येतो अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ सावंत आणि सल्लागार गिरिष आहिरे तसेच कार्यकर्ते प्रदिप देवरुखकर आदींनी लोकमतला दिली. 

Web Title: In Mumbra in five pandals celebrating ganesh utsav and moharam together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.