मुंब्रा कंटेनर अपघातात, २ ठार

By Admin | Updated: December 6, 2015 09:47 IST2015-12-06T09:00:16+5:302015-12-06T09:47:32+5:30

मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी रात्री दोन कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर, दोन जण जखमी झाले.

Mumbra container accident, 2 killed | मुंब्रा कंटेनर अपघातात, २ ठार

मुंब्रा कंटेनर अपघातात, २ ठार

ऑनलाईन लोकमत 

ठाणे, दि. ६ - मुंब्रा बायपास रोडवर शनिवारी रात्री दोन कंटेनरची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर, दोन जण जखमी झाले. कौसा परिसरात रात्री पावणेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. या विचित्र अपघातात चार जण कंटेनरमध्ये अडकले होते. 

आपात्कालीन नियंत्रण विभाग आणि अग्निशमन दलाने अडकलेल्या चौघांची सुरक्षित सुटका करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. भवार व सोनू अशी जखमींची नाव आहेत. भवारला मुंबईच्या सायन तर, सोनूला कळव्याच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आल आहे.  

Web Title: Mumbra container accident, 2 killed