मुंब्रा बायपास रविवारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST2021-03-20T04:40:49+5:302021-03-20T04:40:49+5:30

मुंब्रा : ठाणे ते दिवा रेल्वेमार्ग जोडण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथील मुख्य रस्त्यावर मुंबई रेल्वेविकास काॅर्पोरेशन लिमिटेडकडून ८० मीटर लांब, ...

Mumbra Bypass closed on Sunday | मुंब्रा बायपास रविवारी बंद

मुंब्रा बायपास रविवारी बंद

मुंब्रा : ठाणे ते दिवा रेल्वेमार्ग जोडण्यासाठी मुंब्रा रेतीबंदर येथील मुख्य रस्त्यावर मुंबई रेल्वेविकास काॅर्पोरेशन लिमिटेडकडून ८० मीटर लांब, सहा मीटर रुंद, ११ मीटर उंचीचा तसेच ३५५ टन वजनाचा लोखंडी पूल बसविण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास मुंब्रा बायपास तसेच रेतीबंदर येथील मुख्य रस्ता अवजड तसेच हलक्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान या रस्त्यावरून जेएनपीटी, नाशिक, ठाणे, अहमदाबाद, भिवंडी, तळोजा, नवी मुंबई, घोडबंदर आदी इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहनचालकांना केले आहे.

-------------------

Web Title: Mumbra Bypass closed on Sunday