शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 10:01 IST

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान ९ जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी अपघात होऊन ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, आठ प्रवासी जखमी झाले होते.

महेश कोले लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेच्यामुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान ९ जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी अपघात होऊन ५ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, आठ प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात काळी बॅग पाठीला अडकवलेल्या प्रवाशामुळे झाला होता, असे मध्य रेल्वेने म्हटले होते. याप्रकरणाची ३ महिन्यांहून अधिक काळ चौकशी झाल्यानंतर तयार केलेल्या प्राथमिक अहवालातही मध्य रेल्वेने काळ्या बॅगचेच कारण दिले असून, अपघाताचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे.  या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती.  यासाठी समितीने घटनास्थळी भेट दिली. तसेच,  जखमींसोबतच काही प्रत्यक्ष दर्शींचे  जबाब नोंदवले. मुंब्रा, दिवा, ठाणे, टिटवाळा आणि कसारा अशा विविध स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया, ई-मेल आणि मोबाइल कॅमेऱ्यांद्वारे जनतेने दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानुसार प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला असेही सांगितले की,  कुर्ला कार शेड येथे ट्रेनची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ५३४१ ए डब्याच्या डाव्या बाजूच्या ठिकाणी दरवाजाजवळ आणि खिडकीच्या ग्रिलवर बॅग आदळल्याने घर्षणाच्या खुणा आढळून आल्या.यामुळे रचनेत बदल नाही!

अपघात झालेल्या ठिकाणी कोणतेही बदल केले जाणार नाहीत, कारण मध्य रेल्वेवर असे अनेक वळणदार रूळ असून, असा अपघात कधीही झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  या ठिकाणी दोन वळणदार रूळ आहेत. रेल्वेच्या दोन्ही ट्रॅकमधील अंतर ट्रॅकच्या मध्यापासून ५.३ मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूंपासून ३.६ मीटर असते. 

त्या वेळी नेमके घडले काय? प्रवासी कसे पडले?घटनेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत लोकल मधून २ प्रवासी आणि कसारा - सीएसएमटी लोकलमधून ६ प्रवासी जलद मार्गदरम्यान पडले. तसेच, सीएसएमटी दिशेच्या लोकलमध्ये ५ प्रवासी आणि कसारा दिशेच्या लोकलमधला १ प्रवासी लोकलच्या आतमध्ये पडून जखमी झाला. कर्जत दिशेच्या ट्रेनमधला प्रवासी बॅग घालून फूटबोर्डवरून प्रवास करत होता.  या प्रवाशाची बॅग सीएसएमटी दिशेच्या लोकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या फूटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगला घासली गेली. त्यामुळे हा अपघात घडला. त्या प्रवाशाच्या बॅगची जाडी सुमारे ३० सेमी होती. 

दरम्यान केवळ सीएसएमटी दिशेच्या ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि गर्दीमुळे लोक फूटबोर्डवरून प्रवास करत होते. तर, बॅग असलेल्या प्रवाशाच्या ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. असे असतानाही केवळ फूटबोर्डवरून प्रवास करणे प्रवाशांच्या जिवावर बेतल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbra Accident Caused by Black Bag: Inquiry Report Reveals Cause

Web Summary : A Mumbra train accident, which killed five, was caused by a black bag brushing against commuters. An inquiry revealed a passenger traveling on the footboard with a large bag caused the deadly incident during rush hour. The bag's friction against another train led to passengers falling.
टॅग्स :mumbraमुंब्राAccidentअपघातcentral railwayमध्य रेल्वे