शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या अप्पर वैतरणाचे पाणी कोका-कोला कंपनीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 04:38 IST

कारवाईची मागणी : टेंभा ग्रामपंचायत सरपंचाची तक्रार

कसारा : शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या शेकडो गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना, अप्पर वैतरणा धरणातून वाडा तालुक्यातील कोका-कोला कंपनीला केल्या जाणाऱ्या पाण्याच्या विक्रीवर टेंभा ग्रामपंचायतीने आक्षेप नोंदवला आहे.

अप्पर वैतरणा धरण हे मुंबई महानगरपालिकेचे आहे. येथील पाणी मध्य वैतरणा धरणात सोडून, तेथून मोडकसागरमध्ये सोडले जाते. मोडकसागरमध्ये २० पंप लावून हे पाणी वाडा तालुक्यातील गांधारे येथील बंधाऱ्यात सोडण्यात येते. गांधारे बंधाºयातून हे पाणी कोका-कोला या वाडास्थित कंपनीला व्यावसायिक हेतूने विकले जाते. वास्तविक गांधारे बंधारा हा वाडा तालुक्यातील कुडूस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आला आहे. दुसरीकडे कुडूससह शहापूर तालुक्यातील धरणालगतच्या टेंभा, वैतरणा, अजनुप, उठावासह शेकडो गावे पाणीबाणीने त्रस्त आहेत.मोडकसागर धरण ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे, त्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. याप्रकरणी टेंभा ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा आमले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. धरण परिसरातील गावे तहानलेली असताना व्यावसायिक वापरासाठी पाणी देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ अनिल घोडविंदे यांनी केली आहे.धरण क्षेत्रातील पाणी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाडा तालुक्यातील गांधारे बंधाºयात सोडण्यात येते. या बंधाºयातून ते पाणी कोका-कोलाला पुरवले जाते. याप्रकरणी कारवाई व्हावी.- एकनाथ कोरे, उपसरपंच, टेंभा

टॅग्स :Damधरणthaneठाणे