शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

कामाच्या तणावातून मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाची ठाण्यात आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Published: September 30, 2019 9:55 PM

मुंबईतील अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या धनाजी राऊत यांनी ठाण्यातील रेप्टाक्र ॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहायाने गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. एका पोलीस अधिका-याच्या अशा प्रकारे आत्महत्येच्या घटनेने मुंबई आणि ठाणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला घेतला गळफासकामाचा ताण असल्याची पत्नीजवळ व्यक्त केली होती हतबलतावर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: कामाच्या तणावातून मुंबई रेल्वेतील पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत (३५) यांनी ठाण्यात आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर भागात घडली. त्यांच्या मागे पत्नी वनिता आणि दोन मुले असा परिवार आहे.सकाळी नेहमीप्रमाणे ते व्यायामासाठी बाहेर पडल्यानंतर रेप्टाक्रॉस कंपनीच्या मैदानात एका झाडाला साडीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते हाफ पॅन्ट आणि टी शर्टवर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आले. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी त्यांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घोषित केले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २००६ मध्ये वाहक पदावर भरती झालेल्या धनाजी यांनी २०१६ मध्ये उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते रेल्वेच्या अंधेरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गेली १३ वर्षे पोलीसमध्ये चालक म्हणून नोकरी केल्यानंतर थेट उपनिरीक्षक म्हणून नोकरी करतांना त्यांची खात्यामध्ये मोठी कसरत होत होती. यातूनच ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. तशी हतबलता त्यांनी काही सहकारी आणि आपल्या पत्नीकडेही बोलून दाखविली होती. वर्तकनगर येथील एमएमआरडीएच्या दोस्ती रेंटलमधील बी-४ या इमारतीमधील नवव्या मजल्यावरील ९१७ क्रमांकाच्या खोलीत राऊत हे पत्नीसह वास्तव्याला होते. तर सुमित (१६) आणि आणि अश्विनी (१३) ही दोन्ही मुले गावी शिकण्यासाठी होती. अत्यंत शांत आणि सरळ स्वभावाचे धनाजी इतक्या तणावात असतील, असे कधीच वाटले नाही, असे त्यांच्याच घराच्या बाजूला राहणाºया एका पोलीस कर्मचाºयाने सांगितले. त्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटूंबियांसह संपूर्ण पोलीस वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव अधिक तपास करीत आहेत.-------------

आज डबा उशिरा बनव...दररोज सकाळी मोकळया हवेत फेरफटका मारण्यासाठी जाणा-या धनाजी यांना नियमित व्यायामाची सवय होती. २९ सप्टेंबर रोजी त्यांची साप्ताहिक सुटी होती. तर सोमवारी त्यांना दिवसपाळी होती. आज डबा उशिरा बनव असे सांगून घरातून पहाटे ४.१५ वाजताच घराबाहेर पडले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत ते घरात न परतल्यामुळे त्यांच्या पत्नीने शेजारी राहणा-या महाडीक कुटूंबियांकडे चौेकशी सुरु केली. त्यांनतर काही वेळातच त्यांच्या आत्महत्येची घटना वर्तकनगर पोलिसांना समजली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या