शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

ठाण्यातील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचा वाद चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:41 IST

एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे.

ठाणे : एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. परंतु प्रशासनाच्या विरोधात नेहमी आक्रमक असणाऱ्या विरोधी पक्षाने म्हणजेच राष्टÑवादीने मात्र आयुक्तांच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महासभेत हा प्रस्ताव आल्यास पहिल्यांदाच सत्ताधारी प्रस्तावाच्या विरोधात दिसणार असून विरोधक मात्र प्रस्तावाच्या बाजूने उभे राहताना दिसणार आहेत.गेल्या आाठवड्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु या निर्णयाला महापौरांनी जाहीर विरोध दर्शवत हा निधी महापालिका शाळांच्या सुधारणेसाठी किंवा इतर विकास कामांसाठी खर्च करावा अशी भूमिका घेतली आहे. हीच भूमिका सत्ताधारी पक्षातील इतर ज्येष्ठ मंडळीनीसुध्दा घेतली आहे. त्यामुळे यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर आला तरी, त्याला सत्ताधारी विरोध करेल असा इशाराच त्यांनी दिला आहे.एरव्ही प्रशासनाच्या विरोधात असणाºया राष्टÑवादीने मात्र आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एरव्ही कोट्यवधींच्या भ्रष्टाचारावर डोळे झाकून बसणाºया सत्ताधाºयांनी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी २० कोटी रु पये उपयोगी पडणार असतील तर आडमुठे धोरण घेऊ नये, असा टोला विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. उलट पालिका प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील ज्ञानदानाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठल्याही अन्य प्रकल्पांपेक्षा पिढी घडवणे चांगलेच आहे. ठाण्यामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र असावे यासाठी पहिली मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली होती.प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची व्यवस्था तसेच विद्यापीठामधील इतर प्रशासकीय कामकाजासाठी ती जागा (उपकेंद्र) उपयुक्त ठरते. कलिना येथे न जाता ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिककामे इथून होणार असतील तर त्यासाठी ठाणेकरांच्या करामधील पैसा वापरला गेल्यास चुकीचे नाही. कोट्यवधी रु पयांचा पाणी स्वच्छतेचा प्रकल्प हे केवळ स्वप्नरंजन आहे. गेली १५ वर्षे सुरु असलेल्या कचरा घोटाळ्यात अनेकांचे हात बरबटलेले आहेत. नवीन पिढी घडविण्यासाठी आयुक्त प्रयत्नशील असतील तर त्यांना सत्ताधारी का थांबवत आहेत, असा सवालही पाटील यांनी केला.सत्ताधारी विरोधातवारंवार महासभेत प्रस्तावांच्या विरोधात भूमिका घेणाºया राष्टÑवादीने आता उपकेंद्राला निधी देण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. सत्ताधारी सेनेने मात्र आता या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेतल्याने महासभेत पहिल्यांदाच सत्ताधारी विरोधकांच्या भूमिकेत दिसतील.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठthaneठाणेEducationशिक्षणThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका