शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारपणामुळे मुंबई-नाशिक महामार्गाची झाली चाळण, वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:22 IST

Mumbai-Nashik highway News :

कसारा : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग देशातील महत्त्वाचा आहे. परंतु कामचुकार व्यवस्थापन व कंत्राटदार कंपनीच्या बेबंदशाहीमुळे या राष्ट्रीय महामार्गाची एक ते दीड वर्षापासून पूर्णतः चाळण झाली आहे. गोंदे ते पडघादरम्यान या महामार्गावरील दोन्ही मार्गिका वाहनचालक व प्रवाशांसाठी अपघातासाठी आमंत्रण ठरत आहेत.या महामार्गावर गोंदे (नाशिक) ते पडघा (ठाणे) यादरम्यान ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघाल्याने रस्ते खडबडीत झाले आहेत तर डांबरच निघाल्याने दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली आहे. वर्षभरात २५० हून अधिक दुचाकींचे अपघात झाले असून १५० हून अधिक छोट्यामोठ्या वाहनांचे अपघात झाले आहेत. रस्ता तर सुरक्षित नाहीच, पण अपघातग्रस्तांना पिक इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीकडून वेळेवर मदत मिळत नाही. त्यातच या महामार्गावरील कसारा घाटाची तर अवस्था आणखी वाईट आहे. आठ किलोमीटरच्या जुन्या घाट क्षेत्रात २०१९ मध्ये रस्ता खचला तो अद्याप पूर्ण व्यवस्थित झाला नसून घाट रस्त्यात अनेक ठिकाणी रस्त्याची समानता सुटली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाडीचे टायर फुटून कायम अपघात होतात. घाट रस्त्याला दरीच्या बाजूने दरवर्षी लाखो रुपये खर्चून संरक्षक कठडे बांधण्यात येतात. परंतु त्या एकाही संरक्षक भिंतीला लोखंडी सळया न वापरल्याने तसेच त्या पूर्णतः निकृष्ट असल्यामुळे थोड्या धक्क्यानेही ढासळतात. या निकृष्ट कठड्यामुळे आठ ट्रक, कार कठडे तोडून खोल दरीत कोसळल्या आहेत.या महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले पॅच दुचाकी व छोट्या कारचालकांसाठी जीवघेणे ठरत असले तरी याकडे कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, पोलीस प्रशासनाने अनेकदा तक्रारी व निवेदने दिली. परंतु त्यांना कायम केराची टोपली दाखविण्यात आली आहे. 

महामार्गावर अनेक त्रुटीमहामार्गावर ब्लीनकर लाईट, दिशादर्शक बोर्ड, रबरिंग स्पीड ब्रेकर, धोक्याच्या वळणावर सूचना फलक यासह अनेक त्रुटी आहेत. याबाबत प्रकल्प व्यवस्थापक राकेश ठाकूर यांना वारंवार फोन केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग