भिवंडीला मुंबई पालिकेकडून अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:37 IST2021-04-03T04:37:07+5:302021-04-03T04:37:07+5:30

भिवंडी : शहरातील वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराला अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यास मुंबई महापालिकेचे ...

Mumbai Municipal Corporation supplies additional two million liters of water to Bhiwandi | भिवंडीला मुंबई पालिकेकडून अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

भिवंडीला मुंबई पालिकेकडून अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

भिवंडी : शहरातील वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शहराला अतिरिक्त दोन दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यास मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. खासदार कपिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

पाटील यांच्या मागणीची दखल घेत शहराला वाढीव पाणीपुरवठा मंजूर करीत असल्याचे पत्र मुंबई मनपा आयुक्तांनी खा. पाटील यांना पाठविले आहे. या वाढीव पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिकांची पाणीसमस्या कमी होणार आहे. यंत्रमाग व गोदामपट्टा यामुळे शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येथे नेहमी पाणीटंचाई भासते. मुंबई महापालिकेबरोबरच भिवंडी शहराला स्टेमकडूनही पाणीपुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठ्यासाठी खा. पाटील यांनी चहल यांना पत्र पाठविले व त्यांच्याबरोबर चर्चाही केली होती. भिवंडी महापालिकेने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर जलजोडणी देण्यात येणार असल्याचे चहल यांनी पत्रात नमूद केले आहे.

.......

वाचली.

Web Title: Mumbai Municipal Corporation supplies additional two million liters of water to Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.