मुंबई मनपाने शहापूरचा विकास करावा - मोते
By Admin | Updated: November 15, 2016 04:30 IST2016-11-15T04:30:05+5:302016-11-15T04:30:05+5:30
मुंबईकरांची तहान भागवून मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुका महानगरपालिकेने दत्तक घेणे अपेक्षित असून शहापूरचा विकास करणे

मुंबई मनपाने शहापूरचा विकास करावा - मोते
आसनगाव : मुंबईकरांची तहान भागवून मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुका महानगरपालिकेने दत्तक घेणे अपेक्षित असून शहापूरचा विकास करणे पालिकेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र, अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष केले असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी घेतला आहे. याबाबत, आमदार रामनाथ मोते यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून शेवटचा अल्टीमेटम दिला आहे.
शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा ही जलाशयाची धरणे असून त्याचा पाणीसाठा मुंबईची तहान भागवण्यासाठी केला जातो. याच तालुक्यात अजून दोन मोठी धरणे प्रस्तावित आहेत.
या प्रकल्पांसाठी अनेक गावे प्रकल्पग्रस्त असून त्यांना अद्यापही सोयीसुविधा, नोकऱ्या, शैक्षणिक सुविधा, उत्तम रस्ते व सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्याची व आरोग्याची व्यवस्था करणे मुंबई मनपाचे नैतिक कर्तव्य असून या बाबतीत शहापूर तालुका आजही विकासापासून वंचित आहे. तालुक्यातील गावांमध्ये, वाड्यावस्त्यांवर रस्ते, पाणी, शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा प्रशासन पुरवू शकले नाहीत. (वार्ताहर)