शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai CST Bridge Collapse: तिन्ही परिचारिकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 06:11 IST

मैत्रिणींवर एकाच वेळी घाला; प्रभू, शिंदे, तांबे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ असलेला पादचारी पूल कोसळून गुरुवारी डोंबिवली पश्चिमेतील रंजना तांबे (४५), अपूर्वा प्रभू (३५), भक्ती शिंदे (४०) यांचा मृत्यू झाला. जी.टी. रुग्णालयात परिचारिका असलेल्या या तिघींवर शुक्रवारी दुपारी शिवमंदिर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मैत्रिणी असलेल्या तिघींना एकाच वेळी मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.अपूर्वा या ठाकूरवाडीतील उदयराज सोसायटीत पती अभय प्रभू आणि मुलगा गणेश, मुलगी चिन्मयी यांच्यासोबत राहत होत्या. गणेश सातवीत, तर चिन्मयी पाचवीत शिकत आहे. अविवाहित असलेल्या रंजना या गणेशनगरमधील शिवसागर सोसायटीत आईसोबत राहत होत्या. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. तर, मूळच्या दापोली-पालगड येथील असलेल्या भक्ती या ओमसाई दत्त सोसायटीत पती राजेंद्र शिंदे आणि मुलगा ओम्कार यांच्यासोबत राहत होत्या. ओम्कार आठवीत शिकत आहे.पूल दुर्घटनेत तिघींचा मृत्यू झाल्याची बातमी येताच सर्वत्र शोककळा पसरली होती. अंत्ययात्रेत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर विनीता राणे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांचे घरी जाऊ न सांत्वन केले. 

टॅग्स :CST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना