शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या बैठकीकडे मुल्ला, जगदाळेंची पाठ, आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 11:25 IST

NCP News: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या  अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीला नाराज असलेल्या नेत्यांनी व नगरसेवकांनीच दांडी मारली.

ठाणे  : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व नेत्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या  अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीला नाराज असलेल्या नेत्यांनी व नगरसेवकांनीच दांडी मारली. हणमंत जगदाळे व त्यांच्या पॅनेलमधील तीन माजी नगरसेवक, मुंब्र्यातील राजन किणे, त्यांची पत्नी व भाऊ, राजू अन्सारी, जितू पाटील यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. नाराज नजीब मुल्ला हे बैठकीला हजर नव्हते. मात्र ते दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते.

ठाण्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. पक्ष सोडण्याकरिता आमिष दाखविले जात आहे. कोणीही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, तुमची फसवणूक केली जाऊ शकते. पुन्हा चांगले दिवस येणार आहे, थोडे दिवस थांबा, पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना दिला. मात्र, नाराज मंडळी बैठकीला न आल्याने पवारांचा सल्ला वाया गेला.

१२ ते १६ माजी नगरसेवक फुटणार?  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडी स्थापन केली आहे.  नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिले.   लोकमान्यनगर भागातील हणमंत जगदाळे यांनी इतर तीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे घड्याळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे १२ ते १६ माजी नगरेसवक फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पवार यांनी ठाण्यातील माजी नगरसेवकांची मुंबईत बैठक घेतली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार