शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

उपग्रहनिर्मिती करणाऱ्या मुकुल वाणीच्या पाठीवर विक्रमांच्या कौतुकाची थाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 09:48 IST

उपग्रह निर्मितीच्या सहभागाची नोंद घेत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस, एसिस्ट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी मुकुल यास प्रमाणपत्र दिले

- स्नेहा पावसकरठाणे : डॉ. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनने अंतराळात उपग्रह सोडले होते. या उपक्रमात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमधून डोंबिवलीकर १६ वर्षीय मुकुल वाणी हादेखील सहभागी होता. त्याच्या उपग्रह निर्मितीच्या सहभागाची नोंद घेत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस, एसिस्ट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी मुकुल यास प्रमाणपत्र दिले आहे. मुकुल याला अंतराळ क्षेत्रात विविध संशोधन करण्याची आवड आहे आणि आका याच वर्ल्ड रेकॉर्डच्या धर्तीवर त्याला भविष्यात ‘इस्रो’मध्ये नोकरीच्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ कलामच्या वतीने रामेश्वरम येथून अंतराळात छोटे-छोटे असे १०० उपग्रह सोडले गेले होते. या उपक्रमात देशभरातील काही निवडक विद्यार्थी सहभागी झाले होते.  जानेवारी २०२१ मध्ये पुणे येथे एकदिवसीय कार्यशाळा झाली होती. यात दहादहांच्या गटाने मिळून छोटे-छोटे उपग्रह बनविले होते. सुमारे १०० उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडण्यात आले. कृषीविषयक शास्त्रीय अभ्यासक्रमांची माहिती,  रेडिएशन, ग्लोबल वॉर्मिंग यांची माहिती या उपग्रहांद्वारे मिळाली. हे उपग्रह उड्डाणाची यशस्वी नोंद गिनिज बुकसह इतर चार वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविणाऱ्या संस्थांनी घेतली आहे. त्याच उपक्रमातील यशस्वी सहभागाचे प्रमाणपत्र या पाचही रेकॉर्ड संस्थांनी मुकुल वाणी याला दिले आहे. मी डोंबिवलीतील नारायणा कॉलेजमध्ये ११वी इयत्तेत शिकतो. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या उपक्रमात सहभाग घेतला होता. मला या उपक्रमात आईवडील, कुटुंबीय आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. भविष्यात मला अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करायचे आहे.- मुकुल वाणी, सहभागी यशस्वी विद्यार्थी