शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:58 IST

कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम : असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : कोविडच्या परिस्थितीत जिल्ह्यात एक बळी आणि ३० कर्मचारी बाधित झालेले असताना सर्व अभियंते व एसईए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्र्वतोपरी सहकार्य करीत आहेत. मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असल्यामुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून निषेध आंदोलनाची तयारी सुरूकेली आहे.सध्या संपूर्ण राज्यभरात कोविड-१९ सारख्या महामारीने अक्षरश: थैमान घातलेले आहे. अशी कठीण परिस्थिती असतानाही महावितरणमधील सर्व अभियंते कोविड सेंटर, हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत असून वाडा विभागातील ४८ वर्षीय उच्चस्तर लिपिक अतुल भोईर यांचा मृत्यू झाला असून ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.अशी आणीबाणीची परिस्थिती असतानासुद्धा सर्व अभियंते व एसईए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्र्वतोपरी सहकार्य करीत आहेत, मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असून त्यामुळे अभियंत्यांची प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने १५ टक्के बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरण प्रशासनाने मात्र फक्त जेई ते एईईच्या बदल्यांना अजून मुहूर्त सापडत नसून आॅक्टोबर महिना तोंडावर आला असताना सुद्धा अभियंत्यांची एकही विनंती बदली करण्यात आलेली नाही. उलटपक्षी कोविडसारखी भयावह परिस्थिती असताना ‘अनिवार्य रिक्त पदे’ ठेवण्याची अफलातून संकल्पना राबवली आहे. रिक्त पदे ठेवल्याने अनेक समस्या वाढीस लागणार असून अनिवार्य रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणीचे ठरणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.महावितरण आधीच कठीण वित्तीय परिस्थितीतून जात असताना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, त्यावर सबॉर्डिनेट अभियंता संघटनेने महावितरण प्रशासनाला वेळोवेळी उपायही सुचविले आहेत. मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असून मागील काही महिन्यांपासून बदली धोरणावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. त्यातही अनिवार्य रिक्त पदे ठेवणारच अशी भूमिका घेत असल्याने सर्व अभियांत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.एकीकडे कंपनीची आर्थिक परिस्थिती कठीण असताना संघटनेने महसूल वसुलीबाबत, इंपालमेंटमधील त्रुटी इ. बाबीवर कशा प्रकारे मात करता येईल हे वेळोवेळी सुचविले आहे, मात्र हे महावितरण प्रशासन बदली या विषयावर विनाकारण वेळ वाया घालवत असून संपूर्ण महाराष्ट्रातील सबोर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनचे अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेटून निवेदन दिले असून सदर प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा काढला नाही तर सोमवारपासून निषेध आंदोलन चालू करण्याच्या विचारात संघटना असल्याचे संघटनेचे सहसचिव (पालघर जिल्हा) लक्ष्मण राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सकारात्मक विचार करा अन्यथा आंदोलनबदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या विनंती ठिकाणी बदली व्हावी, अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी, कनिष्ठ अभियंता ते सहायक अभियंता पदोन्नती पॅनल त्वरित करावे, उपकार्यकरी अभियंता म्हणून पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना त्यांच्या पॅरेंट झोनमध्ये पदस्थापना द्यावी व संघटनेस विश्वासात घ्यावे, तसेच महापारेषणमध्ये प्रमोशन पॅनल व स्टाफ सेटअपचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाने अद्यापही हे मुद्दे विचारात घेतले नाहीत, आदी मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक विचार न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीनही कंपन्यांचे अभियंते कोविड परिस्थितीतही आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे सरचिटणीस अभियंता संजय ठाकूर यांनी दिला आहे.