राममंदिरासाठी खासदारांनी दिली पाच लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST2021-02-25T04:55:08+5:302021-02-25T04:55:08+5:30
कल्याण : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राममंदिराच्या उभारणीत ...

राममंदिरासाठी खासदारांनी दिली पाच लाखांची देणगी
कल्याण : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राममंदिराच्या उभारणीत आपलाही खारीचा वाटा असावा, यासाठी ही देणगी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
खासदार कार्यालयात देणगीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी गणेश मंदिराचे विश्वस्त मधुकर चक्रदेव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुरेश फाटक, प्रदीप पराडकर, शिवसेनेचे दीपेश म्हात्रे आणि भाऊ चौधरी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर राममंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी अभियान सुरू झाले. लोकवर्गणीद्वारे हे राममंदिर उभारले जाणार आहे. राममंदिर एक हजार वर्षे टिकावे, यादृष्टीने दगड आणि तांब्याचा वापर केला जात आहे. मंदिर उभारण्यासाठी प्रदीर्घ लढा लढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. प्रत्येकाचे योगदान मंदिर उभारणीत असले पाहिजे, या उद्देशाने शिंदे यांनी त्यांचे योगदान पाच लाखांच्या देणगी स्वरूपात दिले आहे.
---------------------