शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चुक तुमची खापर आमच्या माथी का? खासदार शिंदेंचा संतप्त सवाल; वाहतूक विभागावर संतापले

By अजित मांडके | Updated: November 2, 2023 15:53 IST

चुक पोलिसांची आणि त्याचे खापर आमच्या माथी का मारता, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी वाहतुक विभागाची चांगलीच रखडपट्टी काढली आहे...

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लुईसवाडी येथे शूभदिप हे खाजगी निवासस्थान आहे. या बंगल्यात त्यांचे सूपूत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि कूटंूबिय ये जा करीत असतात. त्यामूळे या ठिकाणी कायदा सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामूळे येथील सर्व्हीस रोड बंद करुन वाहतूकीत बदल करण्याची अधिसूचना वाहतूक विभागाने काढली होती. मात्र त्यावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे चांगलेच संतापले असून वाहतूक विभागाने हे परस्पर पत्रक काढून आमच्या कूटूबियांची नाहक बदनामी केली असल्याचे म्हंटले आहे. चुक पोलिसांची आणि त्याचे खापर आमच्या माथी का मारता असा सवालही त्यांनी उपस्थित करीत वाहतुक विभागाची चांगलीच रखडपट्टी काढली आहे.ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी सायंकाळी एक अधिसूचना काढली होती.  त्यामध्ये नितीन ब्रिजखालून प्रजा स्नॅक्स समोरून सर्व्हिस रोडने लॅण्डमार्क सोसायटी, काजुवाडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रजा स्नॅक्स येथे 'प्रवेश बंद' करण्यात आली असून ती वाहने नितिन ब्रिजखालून कामगार नाका कडे जाणाऱ्या रोडने सरळ जावून पुढे अपोलो फार्मसी मेडिकल, रामचंद्रनगर, जिजामाता नगर येथून डावे वळण घेऊन पुढे जाणार आहेत. तसेच काजुवाडी कट येथून सर्व्हिस रोडने प्रजा स्नॅक्स कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना काजुवाडी कट लॅण्डमार्क सोसायटी कॉर्नर येथे प्रवेश बंद केल्याने ती वाहने काजुवाडी कट येवून उजवे वळण घेऊन हायवे स्लीप रोडने पुढे मार्गक्रमण करील असे म्हटले होते. वाहतुक बदलाची ही अधिसूचना काढल्यानंतर सोशल मिडियावर ती चांगलीच व्हायरल झाली. याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजताच त्यांनी वाहतूक पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पध्दतीने कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा माझ्या कूटूबिंयांनी केली नव्हती. किंवा याची पूर्वकल्पना देखील आम्हाला वाहतूक पोलिसांनी दिलेली नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आमचे येणे जाणे सूकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही.तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय आहे. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही. पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी. तसेच, हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्वीप्रमाणेच खुला ठेवावा अशे त्यांनी सांगितले आहे. त्यांनतर लागलीच वाहतूक विभागाने हि अधिसूचना मागे घेतली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेनाtraffic policeवाहतूक पोलीस