शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

18 गावांची कल्याण उपनगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 20:45 IST

नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा

कल्याण:  केडीएमसीतील 27 गावांमधून वगळण्यात आलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद घटीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना आता पुढील कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात यावा असे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी ठाणो जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत.27 गावांमधील 18 गावे वगळण्याबाबत आणि नऊ गावे केडीएमसीत  ठेवण्यात येत असल्याची घोषणा 14 मार्चच्या विधीमंडळ अधिवेशनात झाली होती. वगळलेल्या 18 गावांची कल्याण उपनगर परिषद असेल अशी अधिसूचना 24 जूनला काढली आहे. या वगळलेल्या गावांमध्ये घेसर, हेदुटणो, उंबार्ली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदीवलीतर्फे अंबरनाथ, आडीवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे.  परंतू 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणा-या सर्वपक्षिय हकक संरक्षण संघर्ष समितीने सरकारच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे असा आग्रह धरला आहे. त्यात 27 गावांच्या नगर परिषदेबाबत पुनर्विचार करा असे निवेदन मनसे आमदार प्रमोद पाटील यांनीही ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना सादर केले असताना दुसरीकडे कोरोनाच्या साथीमुळे 18 गावे केडीएमसीतून वगळू नयेत अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.दरम्यान राज्य सरकारने गावे वगळण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. शुक्रवारी नगरविकास विभागाचे अवर सचिव वाठ यांनी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांना पत्र पाठवून कल्याण उपनगर नगरपरिषद या नावाने नगरपरिषद स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी लेखी हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिका-यांना सूचना करण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन सुनावणी घ्यावी व अहवाल सरकारला सादर करण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.