नवी मुंबईतील दिघावासियांचं रेल्वे रुळावर आंदोलन
By Admin | Updated: February 13, 2017 19:41 IST2017-02-13T14:17:05+5:302017-02-13T19:41:24+5:30
नवी मुंबईतील दिघावासियांनी रेल्वे रुळावर आंदोलन सुरु केल्यामुळे ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती.

नवी मुंबईतील दिघावासियांचं रेल्वे रुळावर आंदोलन
>ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 13 - नवी मुंबईतील दिघावासियांनी रेल्वे रुळावर आंदोलन सुरु केल्यामुळे ट्रान्स हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर दिघा येथील मोरेश्वर इमारतीवर नवी मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात येथील नागरिकांकडून कळवा व ठाणे स्थानकाजवळ आंदोलन करण्यास सुरुवात केली. या आंदोलनामुळे रेल्वेच्या मार्गावरील लोकलची वाहतूक खोळंबली. पोलिसांनी आंदोलन करणा-या काही महिलांना ताब्यात घेत लोकलची वाहतूक सुरळीत केली. मात्र या आंदोलनामुळे बहुतांश लोकल उशिराने धावत होत्या.