पोलिसांची मध्यस्थी : मच्छीमारांचे होड्यांमधून समुद्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:13 AM2020-08-07T03:13:26+5:302020-08-07T03:13:36+5:30

पोलिसांची मध्यस्थी : मच्छी खरेदी - विक्रीसाठी जेट्टी वापराच्या परवानगीची मागणी

Movement of fishermen in boats at sea | पोलिसांची मध्यस्थी : मच्छीमारांचे होड्यांमधून समुद्रात आंदोलन

पोलिसांची मध्यस्थी : मच्छीमारांचे होड्यांमधून समुद्रात आंदोलन

googlenewsNext

आगरदांडा : मुरूड मच्छीमार तालुका संघाने मच्छी खरेदी -विक्रीसाठी आगरदांडा जेट्टी दोन महिन्यांकरिता वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु ही मागणी प्रादेशिक बंदर आधिकाऱ्यांनी नाकारल्याने संतप्त होऊन गुरु वारी परिसरातील कोळी बांधवांनी आपल्या २०० बोटी समुद्रात आगरदांडा जेट्टी परिसरात आणून आंदोलन सुरू केले. यामुळे प्रवासी बोटीला पाच तास थांबावे लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

कोरोना महामारीचा विचार न करता जोरदार पावसासह वाºयातही मच्छीमारांचे समुद्रात आंदोलन सुरूच राहिले; आणि आपली जेट्टीची मागणी करीत राहिल्याने प्रवासी बोटीतील प्रवाशांचे हाल होऊ लागल्याने जेट्टीवाल्याने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच काही मच्छीमारांना बोलावून मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी कुलकर्णी यांच्याबरोबर चर्चा केली. मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी कुलकर्णी यांना वरिष्ठ अधिकाºयांना यासंदर्भात कळविले आहे. परंतु ही जेट्टी प्रवासी असल्याने ती मच्छी खरेदी - विक्रीकरिता देता येणार नाही, असे मच्छीमार संघाला सांगतिले.

परंतु मुरूड मच्छीमार संघाने मासेमारीचा हंगाम सुरू झाल्याने तातडीने खरेदी-विक्रीसाठी जेट्टी आवश्यक आहे. आजचे आंदोलन वादळामुळे थांबले असल्याचे सांगितले. तरी जेट्टीबाबत पुन्हा आंदोलन करू. जेट्टी उपलब्ध नसल्याने मासे विक्रीकरिता अडचणी येत आहेत. त्यामुळे हजारो मच्छीमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल. जगणे अशक्य होईल तरी प्रादेशिक बंदर अधिकाºयांनी या कोळी बांधवांचा विचार करावा; नाहीतर पुन्हा उग्र आंदोलन करू, असा इशारा मुरूड मच्छीमार तालुका संघाने दिला आहे.
 

Web Title: Movement of fishermen in boats at sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.