शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरमध्ये राष्ट्रवादीचे नोटाबंदीविरोधात आंदोलन

By admin | Updated: January 10, 2017 06:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द केल्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कटली. ५० दिवसांच्या मुदतीनंतरही ती न

भार्इंदर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या मूल्याच्या चलनी नोटा रद्द केल्याने देशाची अर्थव्यवस्था विस्कटली. ५० दिवसांच्या मुदतीनंतरही ती न सावरल्याने त्याविरोधात मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी गोल्डन नेस्ट सर्कल येथे आंदोलन केले. बँकांद्वारे क्रेडिट आणि डेबिटकार्ड वापरापोटी अधिभार वसूल करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोलपंपचालकांनी कार्डाखेरीज रोखीने इंधन भरण्यास सुरुवात केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेसचे अपयश आहे. या कॅशलेस धोरणासह नोटाबंदीमुळे प्रत्यक्षात धनाढ्यांचा फायदा, तर सामान्यांचे नुकसान झाले. नोटाबंदीनंतर बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असह्य झाला. त्यात काही कर्मचारी दगावले. त्यांना अद्याप केंद्र तसेच राज्य सरकारने आर्थिक मदत दिलेली नाही. पुरेशा नोटांअभावी सामान्य कुटुंबातील विवाह सोहळे रद्द झाले. काहींनी ते पुढे ढकलले. ही विस्कटलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी मोदींनी ५० दिवसांची मुदत दिली होती. ती संपुष्टात आल्यानंतरही अर्थव्यवस्था सावरलेली नाही. यावरून मोदींचा नोटाबंदीचा निर्णय सपशेल फोल ठरला असून बँकांतील रोखीचे व्यवहार पुन्हा सुरू करावेत. त्यावरील निश्चित मर्यादा हटवण्यात यावी, या मागणीसह नोटाबंदीला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्रा हसनाळे-शिंदे, गटनेते बर्नार्ड डिमेलो, प्रभाग सभापती आसीफ शेख, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, नगरसेविका वंदना पाटील, हेलन गोविंद जॉर्जी, अनिता पाटील, शिल्पा भावसार, प्रवक्ता प्रकाश नागणे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)