मोखाडा तहानलेलाच
By Admin | Updated: February 17, 2016 01:44 IST2016-02-17T01:44:02+5:302016-02-17T01:44:02+5:30
तालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील

मोखाडा तहानलेलाच
रवींद्र साळवे, मोखाडा
तालुक्यात पाच मोठ्या धरणामुळे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असुनही याचे नियोजन शासनपातळीवर केले जात नसल्याने मोखाडा तालुका तहानलेलाच आहे व पाणी टंचाई समस्या येथे भीषण असताना देखील स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही पाणीटंचाईची समस्या सुटलेली नाही व यामुळे घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी वणवण भटकंती करावी लागत आहे.
८५ हजार लोकसंख्या असलेल्या मोखाडा तालुक्यात ५९ महसुल गावे व १४७ पाडे असून दरवर्षीच निम्यापेक्षाा अधिक गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो व या टंचाईग्रस्त गावपाड्याना पाणीपुरवठा करत असताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. परंतु यावर्षी मात्र पाणीटंचाईचा प्रश्न आतापासून समोर येवून ठाकला असून फेब्रुवारी महिन्यातच ५ गावे आणि १० पाडे कोरडे पडले आहेत. त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अद्याप कडक उन्हाळा सुरू झाला नाही. त्या आधीच अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मार्च-एप्रिल-मे पाणीटंचाईची समस्या गंभीर होईल याचे चित्र आताच डोळ्यासमोर उभे आहे. परंतु याकडे गंभीरतेने लक्ष दिले जात नाही.
तसेच मुबलक पाणीसाठा असतानाही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि नियोजनाचा अभाव यामुळे तहानलेल्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तालुक्यातील मारूतीची वाडी, कारेगाव, खोप, पळसपाडा, मोऱ्हाडा या ठिकाणी मोठी धरणे आहेत परंतु करोडो रू. खर्चून बांधलेल्या धरणाचा लगतच्या गावपाड्यांना काही एक फायदा झालेला नाही.
शासनाने करोडो रू. खर्चून मोठी मोठी धरणे बांधली खरी परंतु त्याचे नियोजन मात्र केलेलेच नाही. यामुळे या धरणाच्या लगतच्या गावपाड्याची घोटभर पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे.