टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:24+5:302021-06-16T04:52:24+5:30

ठाणे : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना कासारवडवली नाक्यावरील पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी टेम्पोचालक गणेश ...

Motorcyclist injured in tempo collision | टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी

ठाणे : टेम्पोच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना कासारवडवली नाक्यावरील पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी टेम्पोचालक गणेश एकनाथ शिंदे (४२, रा. नौपाडा, ठाणे) याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घोडबंदर रोडवरील कासारवडवली नाक्यावरील पेट्रोल पंपावर ३२ वर्षीय मोटारसायकलस्वार हा त्याच्या मित्रासह १२ जून रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी उभा होता. त्याच वेळी बाजूलाच उभा असलेला टेम्पो वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून मागील बाजूकडे (रिव्हर्स) आला. तेंव्हा तिथे उभ्या असलेल्या गणेश शिंदे या मोटारसायकलस्वाराला टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात खाली पडून त्याच्या हाताला मार लागला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सी. के. सपकाळे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Motorcyclist injured in tempo collision