शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दूधाच्या टेम्पोच्या धडकेमध्ये ठाण्यात मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:25 IST

दुधाचा टेम्पो भरघाव वेगाने खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात असतांना जॉन यांच्या मोटारसायकलला कॅडबरी जंक्शनजवळ त्याची जोरदार धडक बसली.

ठाणे : टेम्पोच्या धडकेमध्ये जॉन सायमन श्रीसुंदर (34, रा. शेलार पाडा, कोलबाड, ठाणे  ) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पो चालक नबीसाहब महंमद मुल्ला मोहमम्मद मुल्ला (29, रा. सानपाडा, नवी मुंबई, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

जॉन हे त्यांच्या मोटारसायकलीवरुन 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई ते नाशिकच्या दिशेने पूर्व द्रूतगती मार्गावरुन जात होते.  त्याचवेळी मुल्ला याने त्याचा दुधाचा टेम्पो भरघाव वेगाने खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात असतांना जॉन यांच्या मोटारसायकलला कॅडबरी जंक्शनजवळ त्याची जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये टेम्पोच्या चाकाखाली येऊन जॉन गंभीर जखमी झाले. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणो, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद मोरे आणि बीट मार्शल पोलीस नाईक धुरी यांनी तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनास्थळी त्याच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केला. तत्पूर्वी, त्याच्या मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आली. टेम्पोचालक नवीसाहब याच्याविरुद्ध कलम 279 आणि 304- अ , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पेालीस निरीक्षक सोनावणो हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात