सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाण्यात अटक: ९ मोटारसायकली जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: December 7, 2022 21:24 IST2022-12-07T21:23:41+5:302022-12-07T21:24:05+5:30

मध्यवर्ती शोध पथकाची कारवाई: आठ गुन्हे उघड

motorcycle thieves arrested in Thane 9 motorcycles seized 8 crimes | सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाण्यात अटक: ९ मोटारसायकली जप्त

सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाण्यात अटक: ९ मोटारसायकली जप्त

ठाणे: चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आलेल्या मोहमंद शेख (२९, रा. श्रीलंका, मुंबा ठाणे) आणि अम्मार मोहमंद अन्सारी ( २१, रा. अमृतनगर, मुंब्रा, ठाणे ) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडून नऊ मोटारसायकली जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सावंत यांनी बुधवारी दिली.

मुंब्रा, ठाणे, मुंबई आणि भिवंडी परिसरात मोटार वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगार चोरीच्या मोटर सायकली विक्रीसाठी ठाण्यातील साकेत भागात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती शोध पथकाचे पोलीस अंमलदार रोहन म्हात्रे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्याच आधारे
शैलेश साळवी यांच्या पथकाने २ डिसेंबर रोजी साकेत भागात सापळा लावून मोहमंद तुफेल शेख आणि अम्मार अन्सारी या दोघांना शिताफीने अटक केली.

त्यांनी मुंबा, ठाणे, मुंबई आणि  भिवंडी परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा आणि भिवंडीतून ९ वाहने जप्त केली आहेत. त्याला ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: motorcycle thieves arrested in Thane 9 motorcycles seized 8 crimes

टॅग्स :thaneठाणे