गणपती दर्शन करून परतणाऱ्या माय-लेकराचा अपघाती मृत्यू; गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:39 PM2021-09-16T23:39:04+5:302021-09-17T00:05:35+5:30

भिवंडीत अपघातात माय लेकाचा मृत्यू 

mother son died in road accident in bhiwandi | गणपती दर्शन करून परतणाऱ्या माय-लेकराचा अपघाती मृत्यू; गावावर शोककळा

गणपती दर्शन करून परतणाऱ्या माय-लेकराचा अपघाती मृत्यू; गावावर शोककळा

Next

भिवंडी ( दि. १६ ) भिवंडीतील मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली जवळील लोढा धाम इथं अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात माय लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.  नितीन बाळाराम काकडे (वय-२४)  बेबीबाई बाळाराम काकडे ( ४८ ) रा. आमनेपाडा असे अपघातात मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. ते दोघेही मुलीच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊन माघारी घरी परतत असताना मानकोली जवळील लोढा धाम येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने आमणे पाडा गावावर शोककळा पसरली आहे. 

Web Title: mother son died in road accident in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app