शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या उत्कर्षासाठी आईने स्वपक्षाला बगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:43 IST

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधली होती.

- सदानंद नाईकउल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधली होती. मात्र, गेल्या निवडणुकीपेक्षा फक्त पाच हजार मतांची वाढ झाली. या मतदारसंघात आमदार राष्ट्रवादीचा असताना त्या पक्षाच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढण्याऐवजी तब्बल १० हजारांनी कमी झाले. परस्परांत समन्वय नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गायब, तर काँगे्रस पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचे चित्र होते. ओमी कलानी टीम युतीच्या प्रचारात सहभागी, तर राष्ट्रवादीच्या आमदार व शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरल्या नसल्याचे दिसत होते. पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाचे वर्चस्व दिसले. सिंधीबहुल मतदारसंघात कलानी कुटुंबाला मानणारे मतदार असल्याने, वाढीव मताधिक्यासाठी ठाणे व रायगडच्या पालकमंत्र्यांनी अनेकदा ‘कलानी महल’चे उंबरठे झिजवले. तसेच भाजप-शिवसेना, ओमी कलानी टीम, रिपाइं व स्थानिक साई पक्षांना एकत्र आणून निवडणूक कामाला जुंपले. पालकमंत्र्यांनी एक लाख मताधिक्याचे टार्गेट ठेवले होते. प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीपेक्षा पाच हजारांनी मताधिक्य वाढले. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना १५ हजार ५६४ मते मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल १० हजारांनी त्यांचे मताधिक्य कमी झाले. वंचित बहुजन आघाडीचे संजय हेडावू यांना १२ हजार ४१५ मते मिळाली. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना समन्वयाअभावी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या रिपाइं गवई गट व पीआरपीच्या जिल्हाध्यक्षाने शेवटच्या क्षणी वंचित बहुजन आघाडी व युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी लढाईपूर्वीच शस्त्रे म्यान केली होती. पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांना प्रचारासाठी कार्यकर्ते व बुथ एजंट मिळू नये. ही राष्ट्रवादीची मोठी शोकांतिका आहे. यामागे ज्योती कलानी यांचे पुत्रप्रेम हे कारण असल्याचे बोलले जाते. ओमी कलानी हे आमदारकीसाठी इच्छुक असून भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा द्यावा, असा समझोता लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यात झाल्याची चर्चा आहे. कलानी निवडणूक रिंगणात उतरल्यास, ज्योती कलानी यांची माघार निश्चित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे.>मध्यवर्ती गोलमैदान भागात कार्यालय : मराठीसह सिंधी समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी एका वर्षापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोलमैदान या मध्यवर्ती ठिकाणी पक्ष कार्यालय उघडले. दरआठवड्याला सर्वांसोबत संवाद साधून जनसंपर्क वाढवण्याचे काम शिंदे यांनी केले. वडील व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बहुतांश पक्षांची मोट बांधली.>की फॅक्टर काय ठरला?उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कलानी कुटुंबाचा प्रभाव आहे. हे ओळखून भाजपने ओमी कलानी टीमला सोबत घेऊन महापालिकेची सत्ता हस्तगत केली. लोकसभेत युतीच्या उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळण्यासाठी ठाणे व रायगडचे पालकमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण यांनी कलानी यांची मनधरणी केली. उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी ‘कलानी महल’ गाठला तसेच शहरात तळ ठोकला होता.>विधानसभेवर काय परिणाम?विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती कायम राहिल्यास, हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल. आमदारकीचे तिकीट आयलानी की कलानी, असा पेच निर्माण होणार आहे. आयलानी यांना उमेदवारी दिल्यास, भाजपला कलानी यांची समजूत कशी काढणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ulhasnagarउल्हासनगरkalyan-pcकल्याण