शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आई रागावली म्हणून घरातून निघून गेल्या, बेपत्ता जिवलग मैत्रिणींची आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 20:09 IST

या दरम्यान आई मैत्रिणीच्या समोर ओरडली म्हणून रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली त्या दरम्यान मनीषा च्या पाठोपाठ शोभा देखील घराबाहेर पडली

ठळक मुद्देया दरम्यान आई मैत्रिणीच्या समोर ओरडली म्हणून रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली त्या दरम्यान मनीषा च्या पाठोपाठ शोभा देखील घराबाहेर पडली

ठाणे - कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पेठ्याचा पाडा  येथील दोन 16 वर्षीय मुली मंगळवारपासून बेपत्ता होत्या. दुर्दैवाने आज दोन्ही मुलींचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जंगलात सापडला. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

मंगळवार  दि 9/6/21 रोजी मयत मुलीं पैकी मनीषा दादू धापटे या मुलीं च्या आई ने सकाळी शेतावर जात असतांना तु घरीच थांब दुपार चे जेवण तयार करून ठेव असे मनीषाला सांगितले व मनीषाची आई, वडील शेतावर निघून गेले  सर्व जण शेतावर निघून गेल्या नंतर मनीषा तिच्या शोभा वाळू धापटे या मैत्रिणी च्या घरी गेली व तिथे खेळत बसली दुपारी मनीषा ची आई शेतावरून घरी डब्बा घ्यायला आली असता मनीषाने घरात काहीही बनवले नसल्याचे लक्षात आले घरात मनीषा देखील नसल्याने ती मैत्रिणी कडें गेल्याचे समजले म्हणून मनीषाची आई शोभा धापटे हिच्या घरी गेली तिथे मनीषाला जेवण बनवले नाही म्हणून बडबड केली व पुन्हा शेतावर निघून गेली.

या दरम्यान आई मैत्रिणीच्या समोर ओरडली म्हणून रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली त्या दरम्यान मनीषा च्या पाठोपाठ शोभा देखील घराबाहेर पडली. मंगळवारी दुपार पासून मनीषा व शोभा बेपत्ता झाल्या मंगळवारी संद्याकाळ पर्यंत मुलीं घरी न आल्याने दोन्ही कुटूंबातील लोकांनी व स्थानिक ग्रामस्थानी शोध सुरु केला नातेवाईक, इतर मैत्रिणी, सर्व कडे शोध घेतला तरी दोघी जणी आढळून आल्या नाही शेवटी आज स्थानिक ग्रामस्थ व धापटे कुटूंबातील लोकांनी उबरमाळी, फणसपाडा,लगत चे डोंगरा वर शोध सुरु केला असता तिथे एक जणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सकाळी 9 वाजता आढळून आला. त्याची माहिती तात्काळ पोलीस पाटील वाकचौरे यांना देऊन कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नाईक यांना कळवले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक नाईक व कर्मचारी तात्काळ दाखल झाले. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सुचित्रा पाडवी व शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या ऐश्वर्या नायर यांना बोलवण्यात आले. मनीषा दादू धापटेचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसरी मुलगीसुद्धा आसपास असू शकते असा अंदाज घेत शोध सुरु केला. त्यावेळी, 500 मीटरच्या अंतरावर शोभा वाळू धापटेचा मृतदेह दुपारी 4 वाजता कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातDeathमृत्यू