व्यसनी मुलाची आईने केली हत्या

By Admin | Updated: August 7, 2015 01:12 IST2015-08-07T01:12:31+5:302015-08-07T01:12:31+5:30

दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणाऱ्या मुलाची आईने गळा आवळून हत्या केल्याची घटना पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात

The mother of a addict's son murdered | व्यसनी मुलाची आईने केली हत्या

व्यसनी मुलाची आईने केली हत्या

डोंबिवली : दारूच्या व्यसनासाठी पैसे दिले नाही म्हणून मारहाण करणाऱ्या मुलाची आईने गळा आवळून हत्या केल्याची घटना पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक चौधरी असे मयत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्याची आई प्यारी चौधरीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पार्वती निवास येथे राहणाऱ्या अशोकला गांजा आणि दारूचे व्यसन जडले होते. व्यसन करण्यासाठी तो दररोज आई आणि मोठा भाऊ दिनेश यांच्याकडे पैशांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास तो दोघांनाही मारहाण करायचा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या अशोकने एकदा आईचे दागिने विकले होते. दरम्यान, बुधवारी अशोकने तिच्याकडे व्यसनासाठी हजार रुपयांची मागणी केली. परंतु तिने नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The mother of a addict's son murdered