जास्त वैयक्तिक शौचालये
By Admin | Updated: May 14, 2016 00:38 IST2016-05-14T00:38:45+5:302016-05-14T00:38:45+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते.

जास्त वैयक्तिक शौचालये
अंबरनाथ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. अंबरनाथ पालिकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करणारी अंबरनाथ पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.
या योजनेंतर्गत अंबरनाथ शहर पालिकेने जास्तीतजास्त नागरिकांना वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, शहरातील १ हजार ९१५ कुटुंबांनी या शौचालयांसाठी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यावर त्यातील पात्र लाभार्थ्यांना शौचालयाचा निधी देऊन कामास सुरुवातही केली होती. त्यातील १ हजार २४७ कुटुंबीयांनी निधीचा विनियोग करत शौचालयांची उभारणी केली. प्रत्येक शौचालयासाठी पालिकेकडून प्रत्येकी ३ तर राज्य शासनाकडून १२ हजारांचा निधी देण्यात आला. या १५ हजारांमध्ये जास्तीतजास्त नागरिकांनी शौचालय उभारण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या निधीचा योग्य वापर होतोय की नाही, याची चाचपणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले होते. प्रत्येक लाभार्थ्याला भेटून काम करून घेण्यासाठी हे पथक प्रयत्न करत होते. ज्या कुटुंबीयांना अडचणी येत होत्या, त्या दूर करण्याचाही प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)