शहरं
Join us  
Trending Stories
1
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
2
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
3
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
4
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
5
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
6
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
9
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
10
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
11
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
12
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
13
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
14
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
15
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
16
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
17
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
18
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
19
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
20
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 

बेटी से ज्यादा इन्हे गाय की परवाह है, मुंब्य्रातील मुशायऱ्यामध्ये रसिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 3:35 AM

मुंब्य्रातील मुशाय-यामध्ये शायरांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर बोचरी टीका केली. मित्तल मैदानावर उपस्थित ३० हजार रसिकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली.

- कुमार बडदमुंब्रा : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेला भाजपाचा पराभव, गेल्या वर्षी करण्यात आलेली नोटाबंदी, त्यानंतर लागू केलेला जीएसटी, शहरांची नावे बदलण्याचा सुरू असलेला प्रवाह आदी मुद्यांवर शेरोशायरीच्या माध्यमातून मुंब्य्रातील मुशाय-यामध्ये शायरांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर बोचरी टीका केली. मित्तल मैदानावर उपस्थित ३० हजार रसिकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली.देशात ठिकठिकाणी मुलींवर होत असलेले अत्याचार आणि मुलींऐवजी गोवंश हत्याबंदी करून सरकार घेत असलेली गुरांची काळजी, पाच राज्यांमध्ये झालेला भाजपाचा पराभव, हनुमानाच्या जातीबद्दल सुरू असलेले दावे-प्रतिदावे यावरच्या लोकभावना इम्रान प्रतापगढी यांनी मांडल्या.ना किसी को कानून की, ना किसी को न्याय की परवाह है, ना ही दर्दीयो के दर्द की परवाह है, बेटीसे ज्यादा इन्हे गाय की परवाह है. हार गए सारे चालाक, मुबारक हो... राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ के तीन तलाक मुबारक हो... भक्तों को नेताओ ने डाल दिया शंका मे, २०१९ कैसे जीतेंगे इस आशंका मै, दलित बताकर पवनपुत्र को छेड रहे है योगी, हनुमान ने आग लगा दी बीजेपी की लंका मे... लेकर के चोरो की यह बारात निकलो, आपके झुठे जुमलो साथ, बोरिया बिस्तर बांधकर गुजरात निकलो मोदीजी... अशा शब्दांत प्रतापगढी यांनी भाजपा, केंद्र सरकार तसेच मोदींच्या विरोधात भावना व्यक्त केल्या.तत्पूर्वी, हासीम फिरोजाबादी यांनी सध्या कोणत्याही कारणावरून देशभक्ती तपासण्याचा तसेच देश सोडून जाण्याबाबत देण्यात येत असलेल्या इशाºयावर त्यांच्या शायरीमधून भाष्य केले. ते म्हणाले, जो मेरे देश के है गद्दार, जिनको इससे प्यार नही, वह हिंदुस्थान छोड दे... जो मजलुमो को सताते है, जो दंगा भडकाते है, जो नफरत को बहलाते है, घरो में आग लगाते है, बसा ले दिलमे चाहे भगवान, या सीने मे इस्लाम, वह हिंदुस्थान छोड दे... यहा हर बेटी सीता, राधा, मरियम, सलमा है, इनकी लाज लुटने वाले मौलाना हो या महाराज वह हिंदुस्थान छोड दे... और क्या चाहिए इस बदन के लिए, तिरंगा बहुत है कफन के लिए... सरहदो पे हमे भेजकर देखो, जान दे देंगे हम वतन के लिए...प्रत्येक अपयशाची जबाबदारी दुसºयावर ढकलून स्वत: किती निर्मळ आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करणाºयांचा संपत सरल यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, डिझेल, पेट्रोल हमारे हाथ मे नहीं है, रु पया आंतरराष्ट्रीय कारणो से गिर रहा है, भ्रष्टाचार और महंगाई के लिए काँग्रेस जिम्मेदार है, बाकी सब समस्या नेहरू छोड गए है, फिर भी कोई दिक्कत हो तो पाकिस्तान चले जाओ. ज्या सरदार सरोवरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील उंच मूर्ती बसवण्यात आली आहे, त्या सरोवराचा शिलान्यास पं. नेहरू यांनी केला होता, अशी माहिती संपत यांनी शायरीमधून दिली. और इस दिल मे क्या रखा है, चिर के देखो तो मुंब्रावालो का नाम लिखा है... या सुरेश वाडकर यांनी गायलेल्या ओळींना रसिकांनी दाद दिली.पुढील वर्षी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल काय लागू शकतात, ते महेश दुबे यांनी शायरीतून मांडले. ते म्हणाले, अरे चौकीदारो २०१९ करीब आ रहा है, भरम ना पालो, वोटर अब सम्भालो. गरीब मरने के करीब आ गया, जीएसटीने मारा तमाचा करारा, जनता ने दिखाया चाँद तारा. हुई नोटबंदी लगी ऐसी मंदी, व्यापार भी करारा हारा.... बहुत बडा व्यापार है, पर बाबा है... अशा शब्दांत त्यांनी बाबा रामदेव यांना टोला लगावला. तरह तरह के झंडे देखो, इन झंडो मे डंडे देखो, बस एक तिरंगा रह जाएगा... या ओळीमधून आचार्य प्रमोद यांनी राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर व्यक्त केला.हा देश कुणा एकाचा नसून सर्व भारतीयांचा असल्याच्या भावना विजय तिवारी यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले भगत, आजाद, सुलतान मरे है इस देश के लिए, यह मुलुख किसी एक की जहांगीर नही है. मंदिर गिराने से भगवान मीट नही जाता, मज्जीद गिराने से रहमान नही मिटता... ६८ वर्षांमध्ये आपल्याला बहुराष्ट्रीय पंतप्रधान मिळाले आहेत. दहा ते बारा कंपन्या देशाचा पंतप्रधान कोण होणार, हे ठरवतात. इंडिया को कितना भी डिजिटल कर दो, रोटिया गुगल से डाउनलोड नही होती... या ओळींमधून त्यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी मुशायºयाचे आयोजक नगरसेवक अशरफ पठाण, राकाँपाचे विभागीय अध्यक्ष शमीम खान, माजी नगरसेवक सय्यद अली अशरफ उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन नदीम फारु खी यांनी केले.देशातील एकता, अखंडता कायम टिकावीदेशातील एकता आणि अखंडता कायम टिकून राहील, असा विश्वास बिसम भोपालपुरी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, गुलशन-ए-हिंद को सिंचा है लहू से हमने, बीज नफरत के किसी को बोने नही देंगे, जिस्म के जितने ही तुकडे हो जाए हमारे, हम कभी मुलुक के तुकडे नही होने देंगे... अन्याय करणाºयांप्रमाणेच तो सहन करणाराही तेवढाच जबाबदार असतो, हे ताहेर फराजरामपुरी यांनी त्यांच्या रचनेतून सांगितले. ते म्हणाले, जुलूम सहने मे जालीम की मदत होती है, वह समजते है हालात से डर जाएंगे, और क्या होगा, यही होगा मर जाएंगे...

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस