शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

२१ हजारांहून अधिक खेळाडू धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 4:22 AM

वर्षा मॅरेथॉनसाठी ठाणे झाले सज्ज : महापौरांची माहिती; खड्डेही बुजवले

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २९ व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणेनगरी सज्ज झाली आहे. रात्रीचा दिवस करून शहरातील बहुतेक भागांतील खड्डेही बुजवण्यात पालिकेला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. त्यानुसार, या स्पर्धेत तब्बल २१ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

या स्पर्धेचा खर्च यंदा ६५ लाखांवरून ४० लाखांवर आला आहे. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असणार आहे. या स्पर्धेमध्ये २१ किमी पुरुष गट आणि १५ किमी महिला गट व १० किमी १८ वर्षांवरील मुले (खुला गट) या तीन मुख्य स्पर्धांतील स्पर्धकांना टायमिंग चीप देण्यात येणार आहे. तर, विविध १० गटांत ही स्पर्धा पार पाडली जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठीचीही स्पर्धा घेण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या पहिल्या पाच ज्येष्ठांची शारीरिक चाचणी खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल.रविवारी ६.३० वा. महापालिका मुख्यालय चौकातून जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात होईल. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल. या समारंभास खा. राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, संजय केळकर, निरंजन डावखरे, जितेंद्र आव्हाड, उपमहापौर रमाकांत मढवी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, क्रीडा व समाजकल्याण सांस्कृतिक समिती सभापती दीपक वेतकर, ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, समीर उन्हाळे, महाराष्ट्र हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेशपर्यावरणप्रेमी रन फॉर एन्व्हायर्नमेंट या स्पर्धेत सहभागी होणार असून पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देणार आहेत. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयवदानाची चळवळ व्यापक स्वरूपात समाजात पोहोचावी, यासाठी मृत्यूनंतर अवयवदान करणाऱ्यांचे कुटुंबीय व अवयवांमुळे ज्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे, असे लाभार्थीही या स्पर्धेत धावणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेMarathonमॅरेथॉन