भिवंडी : शहरातील एटीएम मशीन बाहेर वॉचमन व आंत सीसीटिव्ही असताना एटीएम कार्ड बदली करणे किंवा एटीएम कार्ड चोरून खातेदाराच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्याच्या घटना वाढत असल्याने शहरातील एटीएम मशीन असुरक्षीत असल्याच्या भावना खातेदारांमध्या बळावत चालल्या आहे.तर एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आरोपींना ओटीपी नंबर कसे समजते? या बाबत बँक ग्राहकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी प्रताप भिमा वळवी यांचे एटीएम कार्ड त्यांच्या कार्यालयांतून शानिवार रोजी चोरून आज सोमवारपर्यंत त्यांच्या बचत खात्यावरील १ लाख ५० हजार ३४० रूपये वेगवेगळ्या एटीएम मशीनमधून काढून घेतल्याप्रकरणी त्यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.तर शहरातील गैबीनगरमध्ये रहाणारा विद्यार्थी जैश मोहम्मद झाहीद शाह(१९)याचे एटीएम कार्ड स्वत:कडे असताना त्याच्याकडे कोणीही ओटीपीची मागणी केली नसताना त्याच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यातील ४० हजाराची रोख रक्कम इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएम मशीनमधून काढल्याची तक्रार जैश शाह याने शनिवारी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच गैबीनगरमध्ये रहाणारे जमाल अहमद खान यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्याचे एटीएम कार्ड बदली करून अज्ञात आरोपीने शहरातील वेगवेगळ्या एटीएम मशीनमधून ४० हजार ६००रूपये काढून घेतले तर ७९ हजार १६९ रूपयांची खरेदी करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा इस्माईल जमाल अहमद खान याने शहर पोलीस ठाण्यात शनिवार रोजी तक्रार केली आहे.यापुर्वी अनेकवेळा शहरातील एटीएम मशीनमधून रक्कम काढीत असलेल्या व्यक्तीची फसवणूक करून त्यांचे एटीएम कार्ड बदलणे अथवा चोरणे अशा घटना घडल्या आहेत. मशीनबाहेर वॉचमन असताना तसेच मशीनच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले असताना अशा घटना शहरात घडल्याच्या तक्रारी या पुर्वी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.त्यामुळे एटीएम मशीन असुरक्षीत झाल्याच्या भावना बँक ग्राहकामध्ये बळावल्या असुन यासाठी बँक व्यवस्थापनाने उपाययोजना करण्याची मागणी शहरातील बँक ग्राहकांकडून वाढू लागली आहे.
भिवंडीत बँकेचे एटीएम कार्ड पळवून पैसे काढण्याच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 14:35 IST
भिवंडी : शहरातील एटीएम मशीन बाहेर वॉचमन व आंत सीसीटिव्ही असताना एटीएम कार्ड बदली करणे किंवा एटीएम कार्ड चोरून खातेदाराच्या खात्यातून मोठी रक्कम काढण्याच्या घटना वाढत असल्याने शहरातील एटीएम मशीन असुरक्षीत असल्याच्या भावना खातेदारांमध्या बळावत चालल्या आहे.तर एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आरोपींना ओटीपी नंबर कसे समजते? या बाबत बँक ग्राहकांमध्ये ...
भिवंडीत बँकेचे एटीएम कार्ड पळवून पैसे काढण्याच्या घटना वाढल्या
ठळक मुद्देमशीनबाहेर वॉचमन तसेच मशीनच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे असताना तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल शनिवार ते सोमवार तीन दिवसांत एटीएममधून रक्कम काढल्याच्या तीन बँक ग्राहकांच्या तक्रारीएटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नंबर कसे समजते? बँक ग्राहकांमध्ये आश्चर्य