विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

By Admin | Updated: December 27, 2016 02:49 IST2016-12-27T02:49:28+5:302016-12-27T02:49:28+5:30

विनयभंगाचा आरोप असलेल्या ओवळा परिसरातील एका युवकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह

Molie's father's father commits suicide | विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

विनयभंगाच्या आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

ठाणे : विनयभंगाचा आरोप असलेल्या ओवळा परिसरातील एका युवकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह घेऊन ठिय्या दिला. पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप करून नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
घोडबंदर परिसरातील एका दहावीच्या विद्यार्थिनीचा तिघांनी विनयभंग केल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात शनिवारी दाखल करण्यात आली. याच भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तक्रारदार मुलगी शिकत असून याबाबत पोलिसांनी शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा बसचालक दर्शन भोकरे (३०) यास अटक केली होती. दर्शन सध्या पोलीस कोठडीत असून एकुलत्या एक मुलावर झालेल्या या कारवाईने व्यथित होऊन त्याचे वडील नरेश महादेव भोकरे (५५) यांनी रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. भोकरे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर दर्शनची पत्नी आणि परिसरातील नागरिकांनी कासारवडवली पोलीस ठाणे गाठले. विनयभंगाचा आरोप करणाऱ्या तक्रारदार मुलीच्या पालकांनी प्रकरण आपसात मिटवण्यासाठी नरेश भोकरे यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, असा आरोप या नागरिकांनी केला. या प्रकारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करून याबाबत आपली तक्रार दाखल करण्याची मागणी दर्शनच्या पत्नीने केली.
पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यामुळे नागरिकांनी सायंकाळी पोलीस ठाण्यासमोर ‘रास्ता रोको’ केला. जवळपास १०० लोकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमला होता. पोलिसांनी दर्शनच्या पत्नीची तक्रार घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. (प्रतिनिधी)

बंदोबस्तात अंत्यसंस्कार
पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नरेश भोकरे यांच्यावर मोगरपाडा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आरोपी दर्शनला पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते.

Web Title: Molie's father's father commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.