शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांचा विनयभंग: ठाण्याचे राखीव निरीक्षक शिंदे यांना अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:19 IST

ठाणे मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे शिवसेना उपनेत्या निलम गो-हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीनिलंबन झाले पण अटकेची कारवाई नाही महिला आयपीएस अधिका-यामार्फतही चौकशी समिती नेमावी

ठाणे: दोन महिला पोलिसांचा विनयभंग प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेल्या ठाणे मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ महिला आयपीएस अधिका-याच्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गो-हे यांनी म्हटले आहे की, महिला पोलिसांच्या विनयभंग प्रकरणात शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी देखील शिंदे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. हा जामीन अर्ज फेटाळण्यासंदर्भात शासनाने न्यायालयाकडे सरकारी वकीलामार्फत मागणी करावी. शिंदे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळण्यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून कोणतीच कारवाई न होता, वेळ काढूपणा केला जात असल्याची शंका असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.तक्र ारदार महिला पोलीस कर्मचा-यांचे समुपदेशन करण्यात यावे तसेच या महिलांची तात्पुरती दुसºया विभागात बदली केली असली तरी शिंदे यांना अटक न झाल्यामुळे मुख्यालयातील महिलांमध्ये घबराट आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे ताबडतोब अटकेची कारवाई करावी.या प्रकरणात आणखीन कोणत्या अधिका-यांचा समावेश आहे का? याचीही सखोल चौकशी होण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMolestationविनयभंग