शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एकाच दिवशी दोन तरुणींचा विनयभंग : दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:12 IST

ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. स्टेशन परिसरातील घटनेत तरुणीने विनयभंगानंतर त्या तरुणाच्या श्रीमुखात लगावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

ठळक मुद्देठाणेनगर आणि कापूरबावडी मध्ये गुन्हा दाखल ठाण्याच्या सॅटीसखालील घटनादुसरी घटना रिक्षामध्ये घडली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील ठाणे स्टेशन परिसरातील रस्त्यावर आणि कापूरबावडी भागातील एका रिक्षामध्ये अनुक्रमे २५ आणि १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना गुरुवारी घडल्या. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी सुनील मोरे (४४, रा. तुळशीधाम, ठाणे) याला तर कापूरबावडी पोलिसांनी अक्षय काटे (२१, रा. विक्रोळी, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. ठाणे स्थानकाजवळील घटनेत विनयभंग करणाऱ्याला तरुणीने श्रीमुखात लगावून पोलिसांच्या हवाली केले.पहिल्या घटनेत मुंबईच्या नायगाव भागात राहणारी २५ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणींसह ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटीस ब्रिजखाली उभी होती. त्यावेळी रंगारी काम करणाºया सुनीलने तिच्या पार्श्वभागावर टपली मारली. हा प्रकार चुकून झाला असल्याचा समज करून सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने तो पुन्हा तिथे आला. त्याने पुन्हा तसाच प्रकार करून तिचा विनयभंग केला. दुसºया वेळी मात्र तिने शांत न राहता त्याच्या श्रीमुखात लगावून आरडाओरडा केला. हा प्रकार इतरही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला ठाणेनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.दुस-या घटनेतील प्रकार जुलैपासून ११ आॅक्टोबर २०१८ दरम्यान सुरू होता. नवी मुंबईच्या घणसोलीतील १९ वर्षीय तरुणी आणि विक्रोळीतील अक्षय काटे (२१) हे दोघेही कापूरबावडी येथील एका मॉलमध्ये नोकरीला होते. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकापर्यंत एकत्रच रिक्षाने जाणे होत होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख झाली होती. तिच्याशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्याशी अनेकदा गैरवर्तन केले. रिक्षातही त्याने तिचा विनयभंग केला. अखेर, याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध गुरुवारी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने त्याला अटक केली.-

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग