ठाण्यात चौघींचा विनयभंग ; एका घटनेतील दोघे गजाआड
By Admin | Updated: August 25, 2015 23:26 IST2015-08-25T23:26:33+5:302015-08-25T23:26:33+5:30
सोमवारी चौघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामधील एका घटनेतील दोघा संशयितांना गजाआड केले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे.

ठाण्यात चौघींचा विनयभंग ; एका घटनेतील दोघे गजाआड
ठाणे : सोमवारी चौघींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यामधील एका घटनेतील दोघा संशयितांना गजाआड केले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे.
कळव्यातील फिर्यादी ही पतीसोबत सायबर कॅफेत असतांना, रेल्वे कॉलनीतील साईबाबा मंदीराजवळ आकाश आणि दुर्गेश या दोघांनी तिचा विनयभंग करून तिच्या पतीला बाबूंने मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोक्याला जखमी झाली असून दोघांना अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. दुसऱ्या घटनेत, कळव्यातीलच १३ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी जाताना, शांतीनगरजवळ तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला. तिसऱ्या घटनेत, लोकमान्यनगरातील ३० महिलेचा ज्ञानोदय शाळेच्या गेटसमोर एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून विनयभंग करणाऱ्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच चौथ्या घटनेत, वैतीवाडीमधील तरूणीचा एका १८ वर्षीय तरूणाने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)