अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: February 23, 2017 05:59 IST2017-02-23T05:59:25+5:302017-02-23T05:59:25+5:30

अश्लील चित्रफित दाखवून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या

Molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ठाणे : अश्लील चित्रफित दाखवून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या व्यक्तीस कोपरी पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.
मागील काही दिवसांपासून तो तिला १२ बंगला परिसरात नेऊन हा प्रकार करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी आणि तो कोपरीच्या चेंदणी कोळीवाडा परिसरात वास्तव्याला आहे. तो काहीतरी विचित्र चित्रफित दाखवत असल्याचे तिने मंगळवारी पालकांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याची बुधवारी कोपरी पोलिसांकडे तक्रार केली. त्याला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलींना काही ना काही आमिष दाखवून अशाप्रकारे अत्याचार करण्याचे प्रमाण काही दिवसांपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाढते आहे. अनेकदा असे अत्याचार ओळखीच्या माणसांकडूनच होताना दिसतात. यामुळे मुलींच्या पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of a minor girl