शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षामध्ये हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:04 IST

एकाच ठिकाणी कामावर असलेल्या सह कर्मचारी तरुणीचा रस्त्याने आणि रिक्षातही पाठलाग करुन विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईगेल्या महिनाभरापासून सतत केला पाठलागदोघेही एकाच ठिकाणी करतात नोकरी

ठाणे: धावत्या रिक्षामध्ये एका ३० वर्षीय हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे (३०,रा. पाचपाखाडी, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.तक्रारदार तरुणी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वास्तव्याला असून घोडबंदर रोडवरील एका स्टुडिओमध्ये ती हेअर ड्रेसर्स म्हणून काम करते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी कामावरून सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली होती. तिच्यासोबत काम करणारा हेमंतही त्यावेळी तिच्याबरोबरच पायी जात होता. त्याचवेळी त्याने तिचा हात पकडल्यानतर तिने तो झटकून त्याला दूर राहण्याबाबत बजावले. नंतर तिच्यापाठोपाठ तोही एकाच रिक्षात बसला. त्यावेळीही त्याने गैरप्रकार केला. पुन्हा ६ डिसेंबर रोजीही ती कामावरून सुटल्यानंतर रिक्षातून घरी जाताना तो पुन्हा तिच्यासोबत रिक्षात बसला आणि तिचा विनयभंग केला. यावेळी तिने आरडाओरडा करुन रिक्षा थांबविली.रिक्षा थांबल्यानंतर मात्र तिने त्याला जोरदार प्रतिकार करीत त्याच्या श्रीमुखात लगावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिलाच ढकलले. त्यावेळी ती कोसळल्यामुळे तिला किरकोळ मारही लागला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आधी नौपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी १० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. नंतर तो कासारवडवली पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग