दोघींचा विनयभंग
By Admin | Updated: March 28, 2017 03:30 IST2017-03-28T03:30:45+5:302017-03-28T03:30:45+5:30
शहरातील वेगवेगळ्या भागांत विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. यातील एका प्रकरणातील संजय चव्हाणला

दोघींचा विनयभंग
ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांत विनयभंगाच्या दोन घटना घडल्या. यातील एका प्रकरणातील संजय चव्हाणला कोपरी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कोपरी कॉलनीत राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून चव्हाणने तिला लग्नासाठी वारंवार आग्रह धरला. तसेच २६ मार्च रोजी घरात शिरून लगट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिने तक्रार दाखल करताच त्याला अटक केली.
दुसऱ्या घटनेत उथळसर भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरून विराज पाटील याने संपर्क साधला. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून फोनद्वारे तसेच फेसबुक मेसेजद्वारे कॉल करून वेगवेगळ्या वेळी त्याने पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तिने २६ मार्च रोजी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)