तब्बल १७ वर्षांनी सापडला मोक्काचा आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:40 IST2021-03-20T04:40:18+5:302021-03-20T04:40:18+5:30
मीरा रोड : शस्त्राचा धाक दाखवून २००४ मध्ये एका सराफा दुकानातून ३० लाखांचा ऐवज लुटून पळालेला मोक्कामधील आरोपीला १७ ...

तब्बल १७ वर्षांनी सापडला मोक्काचा आरोपी
मीरा रोड : शस्त्राचा धाक दाखवून २००४ मध्ये एका सराफा दुकानातून ३० लाखांचा ऐवज लुटून पळालेला मोक्कामधील आरोपीला १७ वर्षांनी भिवंडी येथून अटक केली आहे.
५ फेब्रुवारी २००४ रोजी पहाटेच्या सुमारास मीरा रोडच्या शांतीनगर-९ मधील भारती ज्वेलर्स या सराफ दुकानाच्या रखवालदारांना रिव्हॉल्व्हर व चाकूचा धाक दाखवून दुकान लुटले होते. दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी तिजोरी फोडून २९ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला होता.
या गुन्ह्यातील आरोपी भूशीसिंग ऊर्फ दीपकसिंग चोनासिंग टाक (३६) हा गेली १७ वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. टाक हा भिवंडी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट-१ चे निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भिवंडी येथून आरोपीला अटक केली. टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्काखालीही कारवाई करण्यात आली आहे.