आठवडाभरात मोबाइल चोर जेरबंद
By Admin | Updated: October 19, 2015 01:03 IST2015-10-19T01:03:26+5:302015-10-19T01:03:26+5:30
शहरातील यशवंतनगर येथील दुकान फोडून मोबाइल चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जव्हार पोलिसांनी जेरबंद केले आहे. आठवडाभरात या चोरीचा छडा लागला आहे.

आठवडाभरात मोबाइल चोर जेरबंद
जव्हार - शहरातील यशवंतनगर येथील दुकान फोडून मोबाइल चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जव्हार पोलिसांनी जेरबंद केले आहे. आठवडाभरात या चोरीचा छडा लागला आहे. या आरोपींकडून पालघर व ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत घडलेल्या सर्व चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पो.उप.नि. विशाल रुमणे यांनी व्यक्त केली.
दारेन कम्युनिकेशन या मोबाइल शोरूमचे दुकान फोडून चोरांनी ५ आॅक्टोबरच्या मध्यरात्री ३५ मोबाइल चोरले होते. दुकानमालक इम्रान मीरहासन चाबुकस्वार, रा. जव्हार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जव्हार पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरु द्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चंदू गुंड, रा.
क्रांतीनगर, जव्हार यास पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळील चोरीचे मोबाइल जप्त केले. या चोरीत आणखी दोन साथीदार असल्याची माहिती त्याने दिल्यानंतर तपासाची चके्र आणखी फिरू लागली. पोलिसांनी तातडीने तपास करून सागर रामचंद्र गावित, रा. वेहपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे व मनोज रामलाल बरोडा, बीजपाडा, ता. भिवंडी, जि. ठाणे यांंना जेरबंद केले. त्यांच्याकडून पोलिसांनी २,२२,६४० लाख रुपये किमतीच्या मोबाइलपैकी २ लाख रु पये किमतीचे मोबाइल हस्तगत करण्यात यश मिळविले.