मोबाईल चोरास रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST2021-06-16T04:52:17+5:302021-06-16T04:52:17+5:30

डोंबिवली : अंबरनाथ येथील कैलास गौड (२०) हा प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत असताना त्याचा मोबाईल अरबाज खान ...

Mobile thief caught red handed | मोबाईल चोरास रंगेहाथ पकडले

मोबाईल चोरास रंगेहाथ पकडले

डोंबिवली : अंबरनाथ येथील कैलास गौड (२०) हा प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत असताना त्याचा मोबाईल अरबाज खान (१९) या चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकात लोकल येताच घडली. गौड यांनी आरडाओरड करताच स्थानकातील लोहमार्ग पोलिसांनी त्यास रंगेहाथ अटक केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. शार्दुल यांनी सोमवारी रात्री दिली. चोराची आरटीपीसीआर चाचणी न झाल्याने तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अखेर सोमवारी दुपारी कल्याण रेल्वे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे शार्दुल म्हणाले. कोविड चाचणी केल्यानंतर मंगळवारी त्याला कोठडीत पाठविण्यात येणार असून सध्या तो कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mobile thief caught red handed