दारूसाठी मोबाईलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:53 IST2021-02-20T05:53:20+5:302021-02-20T05:53:20+5:30
मुंब्राः दारूसाठी उसने पैसे दिले नाही म्हणून, मित्राचा मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिव्यातील दातिवली रस्ताजवळील ...

दारूसाठी मोबाईलची चोरी
मुंब्राः दारूसाठी उसने पैसे दिले नाही म्हणून, मित्राचा मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दिव्यातील दातिवली रस्ताजवळील शांतीनगर परीसरातील ओमसाई चाळीत राहत असलेला राहुल गुप्ता हा तरुण त्याच्या मोबाईलवर गेम खेळत होता. त्यावेळी तेथे पोहोचलेल्या निखिल वर्मा या त्याच्या मित्राने दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. ते देण्यास नकार देऊन गुप्ता मोबाईल तेथेच ठेऊन पाणी पिण्यासाठी घरातील किचनमध्ये गेला. तो तेथून परत येण्याच्या काही मिनिटाच्या आत वर्मा मोबाईल घेऊन पसार झाला,अशी तक्रार गुप्ता याने मंगळवारी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली.