मोबाइल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST2021-03-18T04:41:01+5:302021-03-18T04:41:01+5:30

------------------- दुचाकी चोरी डोंबिवली : तेजस कानडे यांनी त्यांची दुचाकी पूर्वेतील मंजुनाथ शाळेसमोर यादव डेअरीजवळ पार्क केली होती. ...

Mobile lamps | मोबाइल लंपास

मोबाइल लंपास

-------------------

दुचाकी चोरी

डोंबिवली : तेजस कानडे यांनी त्यांची दुचाकी पूर्वेतील मंजुनाथ शाळेसमोर यादव डेअरीजवळ पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली. ही घटना रविवार ते मंगळवारदरम्यान घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-------------------

जुन्या भांडणातून मारहाण

डोंबिवली : जुन्या भांडणाच्या रागातून विजय ठाकूर या रिक्षाचालकाला जय ठाकूर, राणा ठाकूर, गणेश ठाकूर, सुरज ठाकूर यांनी काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना पूर्वेतील सोनारपाडा परिसरात सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------

रिक्षाचालकावर वार

कल्याण : ‘माझे भाडे घेऊन का गेलास’, यावरून झालेल्या वादात विशाल जाधव या रिक्षाचालकाने अरुण धडे या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून चाकूने वार केले. ही घटना पूर्वेतील दुर्गामाता रिक्षास्टॅण्डवर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता घडली. याप्रकरणी जाधवविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------

Web Title: Mobile lamps