शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज विक्रेत्यास अटक करताना जमावाचा पोलिसांवर हल्ला; भाईंदरमधील उत्तन येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 12:38 IST

एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.

मीरा रोड : अमली पदार्थ विकणाऱ्या आरोपीला अटक करून नेत असताना अमली पदार्थविरोधी शाखेच्या पोलिस पथकावर १३ ते १८ जणांच्या जमावाने बांबू आणि काठ्यांनी हल्ला चढवला. एका महिला पोलिसाचे केस ओढून बांबू मारला व विनयभंग केला. उत्तन पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अन्य तिघा हल्लोखोरांना अटक केली आहे.

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी शाखेचे पोलिस निरीक्षक अमर मराठे व ५ पोलिस कर्मचारी असे ६ जण २० फेब्रुवारीला रात्री भाईंदरच्या उत्तन येथील सरकारी जागेत बेकायदा वसलेल्या धावगी झोपडपट्टी येथे कारवाईसाठी गेले होते. तेथे  हनीफ शेख नावाच्या अमली पदार्थ माफियाला पकडून त्याच्याकडून ३२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. पोलिस पथक हनीफ याला पकडून नेत असताना नशा केलेले काही तरुण आणि महिला अशा १३ ते १८ जणांच्या जमावाने पोलिसांना घेराव घातला. त्यावेळी जमावाने पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. काहींनी बांबूने पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जमावाने महिला पोलिस लतादेवी एक्कलदेवी यांना बांबूने मारहाण करून जखमी केले, त्यांचे केस ओढले व विनयभंग केला.

आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी

या घटनेप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे व पथकाने कारवाई करत अब्बास अली केसर हुसेन मिर्झा (३८), अंकुरकुमार वीरेंद्र भारती (२४) व राजू जयंत्री गौतम (१९) या तिघांना अटक केली असून त्यांना ठाणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांनी एक अल्पवयीन आरोपी सुद्धा ताब्यात घेतले आहेत. अन्य पुरुष व महिला आरोपींचा पोलिस शोध घेत असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, असे दादाराम करांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस