स्वखर्चानेच बंगलोर दौऱ्यास जाण्याचा मनसेच्या परिवहन सदस्याचा पवित्रा
By Admin | Updated: July 14, 2015 23:08 IST2015-07-14T23:08:29+5:302015-07-14T23:08:29+5:30
केडीएमटीचे निवडक सदस्य अभ्यास दौऱ्यासाठी लवकरच बेंगलोर येथे जाणार आहेत. त्यासाठी होणारा खर्च मिळेलच. परंतु, आपण स्वखर्चाने जाणार असल्याचा

स्वखर्चानेच बंगलोर दौऱ्यास जाण्याचा मनसेच्या परिवहन सदस्याचा पवित्रा
डोंबिवली : केडीएमटीचे निवडक सदस्य अभ्यास दौऱ्यासाठी लवकरच बेंगलोर येथे जाणार आहेत. त्यासाठी होणारा खर्च मिळेलच. परंतु, आपण स्वखर्चाने जाणार असल्याचा असा पवित्रा मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात त्यांनी बुधवारी केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हा निर्णय सांगितला. परिवहनचे मिळणारे ६ हजारांचे मानधन म्हात्रे घेत नाहीत. तर त्यात ४ हजार टाकून होणारा १० हजारांचा निधी ते केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी देणार आहेत.
यावर अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने जाण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, जेवढा निधी वाचेल, तो परिवहन कर्मचाऱ्यांसाठी मात्र खर्च करता येणार नाही. तो महापालिकेच्या अखत्यारीतच राहील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्या या भूमिकेची दखल घेऊन सर्वसाधारण सभेत त्यांचा यथोचित सन्मान करण्याचेही आश्वासन त्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)