मनसे स्वबळावर लढणार

By Admin | Updated: March 29, 2017 05:33 IST2017-03-29T05:33:54+5:302017-03-29T05:33:54+5:30

भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

MNS will fight on your own | मनसे स्वबळावर लढणार

मनसे स्वबळावर लढणार

रोहिदास पाटील /अनगाव
भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसली तरीही पक्ष पातळीवर जोरदार हालचाली  सुरू झाल्या आहेत. भाजपा
तसेच काँग्रेस, समाजवादी पक्ष  बांधत असलेली आघाडीची मोट तर दुसरीकडे शिवसेनेने या आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनेही स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार केला आहे. पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणार हा पक्षाचा अजेंडा असेल, अशी माहिती पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ््या पक्षांची तयारी सध्या सुरू आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झालेला नसल्याने थेट घडामोडींना वेग आलेला नाही. मात्र पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांची वर्दळ सुरू झाली आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या समर्थकांसह ठिकठिकाणी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गेल्यावेळी दोन प्रभागांचा एक प्रभाग होता. यावर्षी चार प्रभागांचा एक प्रभाग यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सध्या महापालिकेत मनसेचा एकही सदस्य नसला तरी या निवडणुकीत सर्व जागा लढवणार असून, त्यामध्ये यश मिळेल असा विश्वास भिवंडी पूर्वचे शहर-जिल्हाध्यक्ष अफसर खान यांनी व्यक्त केला.
विविध पक्षातील कार्यकर्ते मनसेमध्ये येण्यास उत्सुक आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या नसल्या तरीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरात आमची ताकद जरी कमी असली तरी विविध विषयांवर आंदोलन, धरणे करून तरुणांना आर्कषित करण्याचा प्रयत्न पक्षाच्यावतीने केला आहे. त्यामुळे पक्षाला यश मिळेल असा दावा
खान यांनी केला आहे. खरे चित्र निवडणुकीच्यावेळी स्पष्ट होईल.

भिवंडीत पक्षाची ताकद वाढली आहे. मुस्लीम व हिंदू असे अध्यक्ष दिले आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज आमच्याकडे आहे. यावेळी मनसे परिवर्तन घडवेल अशा पद्धतीने व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
- डी. के. म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्ष.

पाणी, रस्ते, बेकायदा बांधकामांमध्ये सर्वच पक्षातील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरु न भ्रष्टाचार केला आहे. आज कर्मचाऱ्यांना तीनतीन महिने पगार मिळत नाही. पालिका डबघाईला आली असून, या विरोधात आवाज उठवणार आहोत.
- मदन पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष.

पालिकेने शहरात १५ जलकुंभ बांधले. मात्र बहुतांश जलवाहिन्यांमध्ये पाणीच नाही. परिणामी नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या जलकुंभांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. - विकास जाधव, उपाध्यक्ष.

Web Title: MNS will fight on your own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.